Posts

  NEEM TREE कडूलिंबातील औषधी गुण ...* कडूलिंबाचा प्राचीन काळापासून आयुर्वेदिक औषधी म्हणून वापर होत आहे . हे एक असं झाड आहे , जे खूप कडू असतं . पण आपल्या औषधी गुणांमुळे या झाडाचं महत्त्व खूप मोठं आहे . ◼️ त्वचा व केसांची काळजी घेत रक्त शुद्ध करण्याचं काम कडूलिंब करतं . यासाठी कडूलिंबाच्या पानाचा काढा बनवून प्यावा . ◼️ जर हातापायाला खूप घाम येत असेल तर कडूलिंबाचं तेल उपयुक्त आहे . ◼️ चेहऱ्यावर मुरुम झाल्यास ही कडूलिंबाचं तेल उत्तम ठरतं . चेहऱ्यावर जुने डाग व उष्णतेनं पडलेले डाग जाण्यासाठी निंबोणीचं तेल लावावं . ◼️ फोडं झाल्यास कडूलिंबाची साल घासून लेप लावा . ◼️ जर केसांमध्ये उवा झाल्या असतील तर कडूलिंबाचं तेल लावा . ◼️ टक्कल पडलं असेल तर कडूलिंबाचं तेल लावा . ◼️ केस पिकत असतील तर कडूलिंब , बोराची पानं उकळून त्या पाण्यानं केस धुवा . कमीत कमी एका महिन्यात फरक जाणवले . ◼️ कुष्ठरोगावर कडूलिंब वरदान ठरलंय . या रोगावर कडूलिंबानं उपचार होऊ शकतात . ◼️ ताप आल्य...