Posts

  Two leaved foods आता थोडी द्विदल धान्यांची ओळख करून घेऊ .*   * द्विदल म्हणजे ज्यापासून डाळी तयार केल्या जातात ती धान्ये . या कडधान्यांचा आपण सर्रास वापर कुठल्या ना कुठल्या स्वरूपात मोठ्या प्रमाणावर करीत असतो .* * ही धान्ये सर्वसाधारणपणे मधुर तुरट रसाची , कोरडी , वात वाढवणारी , कफपित्तनाशक , मलावष्टंभ करणारी असतात त्यामुळेच भाजीला पर्याय म्हणून रोज कडधान्याची उसळ आहारात योग्य नाही . आठवड्यातून तीन दिवस चालू शकेल .* * सर्व धान्यांमध्ये मूग श्रेष्ठ . किंचीत वातूऴ आहेत , पण पचायला हलके , कफपित्तनाशक . हिरव्या रंगाचेच मूग उत्तम . मूग शिजवून त्यावरील पाण्यात सैंधव , हिंग , मिरी , पिंपऴी , सुंठ घालून जीऱ्यासह तूपाची फोडणी दिली की , मूगाचे कळण किंवा यूष तयार होते . हा यूष अग्निवर्धक , जीभेला चव आणणारा , पाचक , ताकद देणारा असल्याने आजारपणात व नंतरच्या अशक्तपणात उत्तम .*   * यानंतरचे मूगाखालोखाल वापरण्यास चांगले धान्य म्हणजे मसूर . पचायला हलकी , पौष्टीक , कफ / पित्त / रक्तविकारा...