Posts

  MEDICINAL USES OF BRINJAL वांग   आणि औषधी.. काय पण सांगताय... हा लेख वाचा ,, लाईक करून सर्वांना शेअर करा...* वांग्या बद्दलची माहिती ऐकल्यावर , ' काय राव , सांगता वांगे एवढ औषधी असतय होय ?' असा एक साधा प्रश्न , गावाकडच्या माणसाने मला विचारला. वांग्याचं भरीत तुम्ही खाल्ले का हो ? आम्ही अजून मधून वांग्याचं भरीत आवडीने खातो , व भरीत करायला तर एकदमच सोप्प .विशेषतः चुलीवर तयार केलेल्या म्हणजेच भाजून तयार केलेले खूपच उत्कृष्ट लागते , वांगे हे खूपच पौष्टिक   आहे. भाजी करताना वांग हे खूप कच्चे नसावे व खूप पिकलेले ही नसावेत , ज्याच्यात परिपक्व असा आहे , पूर्ण असे विकसित झालेले वापरावे , लहान वांगे हे पित्त व कफ कमी करते. मोठे वांगे पचायला हलके असले तरी थोडे पित्तकर आहे. वांगे खायचे झाल्यास डोरली वांगे , कोंबडीच्या अंड्याचा सारखे असणारे पांढरे वांगे , काटेरी वांगी व गावरान अशा काही जाती आहेत तेच खावे , असे आमच् आग्रहाचे सांगणे आहे , वांग्याचे एवढे औषधी उपयोग आहेत हे बऱ्याच जणांना माहिती नसते , गावाकडील लहानपणाचे दिवस मला अजूनही आठवतात , लग्नामध्ये किंवा कार्यामध्ये , पळसाच्या ...
  EFFECTS OF OVEREATING सण आहे म्हणून भरपूर खाता नंतर अपचन - गॅसेसचा त्रास होतो ? डॉक्टरांचा ‘ हा ’ सल्ला तातडीने वाचा .....** सणावाराला सगळे एकत्र जमले की नकळतच ४ घास जास्त खाल्ले जातात . त्यातही तळकट , तुपकट असेल की तोंडावर ताबा राहत नाही . सध्याचे हवामानही अन्न पचनासाठी चांगले नसल्याने खाल्लेले अन्न शरीरात तसेच राहते आणि मग पचनाच्या तक्रारी उद्भवतात . गॅसेस , अपचन आणि अॅसिडिटी या त्रासांनी दररोज लाखो लोकांचे जीवन अस्वस्थ असल्याचे आपण पाहतो . या समस्या मुख्यतः चुकीच्या आहाराच्या सवयी , नियमित व्यायामाचा अभाव , तणाव , अनियमित झोप आणि जड अन्नाचे अधिक सेवन यामुळे उद्भवतात . याशिवाय गरम , तिखट , मसालेदार आणि तेलकट पदार्थांचे अतिसेवनही अॅसिडिटी आणि गॅसेसचे मुख्य कारण ठरते अतिवेगाने किंवा अतिमात्रेने खाणे , तासन्‌तास बसून काम करणे आणि पाण्याचे कमी प्रमाण हे देखील अपचनाचे कारण ठरू शकते . या समस्यांच्या मूळ कारणांचा आणि त्यावरच्या उपायांचा आढावा आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून घेण...