Posts

Showing posts from March, 2026
  CRAVING FOR FOOD   * येताजाता गारेगार बर्फ खाण्याची इच्छा होते ? बर्फ खाण्याचा हा आजार म्हणजे शरीरात ‘ही’ कमतरता.....**   आपल्याला काहीवेळा एखादा पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होते. अशावेळी आपण तो पदार्थ जोपर्यंत खात नाही तोपर्यंत आपल्याला त्या पदार्थांचे विचार डोक्यात येतात. एवढंच नाही तर डोळ्यांसमोरही तो पदार्थ दिसू लागतो , याला ' फूड क्रेविंग्स ' म्हणतात. ' फूड क्रेविंग्स ' कधीही आणि कोणालाही येऊ शकतात. काहीजणांना फ्रिजमधील थंड बर्फाचा खडा खाण्याचे क्रेविंग्स होतात. अशावेळी फ्रिजरमध्ये साचलेला फ्रोजन बर्फ किंवा ट्रे मध्ये ठेवलेला बर्फाचा खडा काढून तो चक्क दातांनी चावून खाल्ला जातो. जर आपल्याला देखील अशी सारखं बर्फ खाण्याची इच्छा होत असेल तर आपल्याला ' पॅगोफेजिया ' झाला असण्याची शक्यता आहे. दीपशिखा जैन या न्यूट्रिशनिस्टने इंस्टग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत या आजाराबद्दलची माहिती दिली आहे. या व्हिडीओमध्ये दीपशिखा बर्फ खाण्याच्या क्रेविंग्स बद्दल सांगत आहे. बर्फ खाणे हे आपल्या आरोग्यासाठी अपायकारक आहे. वारंवार बर्फ खाल्ल्याने त्याचे वाईट परिणाम आपल्या शरी...