प्राचीन भारतीय "वास्तुशास्त्र
पं. प्रदीप.~9890325866.
प्राचीन भारतीय "वास्तुशास्त्र हे दिशा, आणि पंचमहाभूते यावर आधारलेले "भवन निर्मितीचे"शास्त्र होय! शास्त्र म्हणजे विज्ञान,, विज्ञान म्हणजे सायन्स आणि, सायन्स म्हणजे काय? ऑक्सफर्ड डिक्शनरी प्रमाणे त्याची व्याख्या खालील प्रमाणे....
Science, a branch of knowledge requires systemic study and method, specially dealing with substances, life ,and natural laws.
substances=1) matter with more or less uniform properties,2) a particular kind of this, 3) something written or spoken, 4) reality, 5) solidity...
प्राचीन वास्तुशास्त्र हे निखळ शास्त्र आहे. त्याचे निकष खालील प्रमाणे 1) कार्यकारण भावावर आधारित2) वापरात आणन्यास योग्य3) कायमस्वरूपी, 4) नियमाबध्द,5) उपयुक्त, 6) विश्वव्यापकता..…
प्राचीन वास्तुशास्त्र वर दिलेले सर्व निकष पाळते. प्राचीन वास्तुशास्त्रात केवळ बांधकामाला महत्त्व दिले गेलेले नसून भूमी आणि त्यावर वस्ती करू इच्छिणाऱ्या देव, माणूस, पाळीव प्राणी आणि भूमीचाही बारकाईने विचार करण्यात आलेला आहे. वास्तुपुरुष ही संकल्पना केवळ भवन निर्मिती पूर्तीच मर्यादित नसून तिची व्यापकता पृथ्वीची वास्तु ,राष्ट्राची वास्तु, प्रांताची वास्तु,उपनगराची वास्तु,कॉलनीची वास्तु,किंवा छोटे घर या मर्यादेपर्यंत संकुचीत करता येते !म्हणजेच "वास्तु" चा "घटबिंब सिद्धांत "होय!
प्राचीन वास्तुशास्त्रामध्ये भवन निर्मिती बरोबरच भवनाचे सौंदर्य ,आणि त्यात निवास करू इच्छिणाऱ्या जातकाचा आणि त्याच्या परिवारातील सर्व सदस्यांच्या "सर्वांगीण समृद्धीचा" व आरोग्य याचाही समावेश केलेला आहे.
प्राचीन भारतीय वास्तुशास्त्र हे दिशा आणि पंचमहाभूते वास्तु पदाविण्यास इत्यादी 37 ते 38 घटकांवर आधारलेले नियमबद्ध शास्त्र होय! दिशांचा विचार करिता,4 प्रमुख पूर्व दक्षिण पश्चिम उत्तर+4, उप, ईशान्य आग्नेय नैऋत्य वायव्य,+2 उर्ध्व आणि अधर,,, यांचा विचार केला जातो. पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी ,आप ,तेज ,वायू ,आकाश, ही होत... आणि निसर्ग यात साम्य आहे कारण, पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी होय!
तुम्ही भूतलावर भवन निर्मिती करता म्हणजेच ब्रम्हांडातील पंचमहाभूतांना एका विवेक्षित ठिकाणी कोंडून ठेवता. पंचमहाभूतांच्या बाबतीमध्ये विचार करता ही संख्येने पाच आहेत महा आहेत आणि शेवटी ती भुते आहेत... सबब तुमच्या घरात ही पंचमहाभूते गुण्यागोविंदाने नांदावयाची असल्यास त्यांना त्या भवनात सुयोग्य स्थान दिले गेलेच पाहिजे अन्यथा,,, त्यांचे संतुलन बिघडते आणि ती बेभान होतात सबब जमेस ना गडेच ना अशी जातकाची परिस्थिती निर्माण होते.
5 महाभुतांचा विचार करता ती अनुक्रमे ईशान्य आग्नेय नैऋत्य वायव्य या कोणात व भावनाच्या अगर भूखंडाच्या ब्रह्म स्थानात कार्यरत असतात.
अग्नी तत्व अथवा भवनाच्या अग्नि को प्रयात स्थित असून त्याची अधिपती देवता अग्नी देव होय! आणि, वास्तुतील ऊर्जा, पचन स्वयंपाक घर, अग्नी संबंधित कामे यांच्याशी निगडित असते. अग्नि म्हणजे दीपक यज्ञ पूजा स्वयंपाक घर, आत्मबल, पैसा, पैशाची सुसंधी आणि फ्लो, यासोबत लक्ष्मी स्त्री, सून हार्मोन्स,,,,,, इत्यादींचा बारकाईने विचार करावा लागतो.
बृहत्संहितेत, वास्तुशास्त्राचे नियम दिलेले आहेत आणि प्रत्येक देशा एका महाभूतांशी आणि देवतेशी जोडलेली आहे आणि आग्नेयला अग्नीदेव स्वयंपाक घरासाठी उत्तम मानलेली आहे.
हो ना आतील स्वयंपाक घर आहे अग्नी कोणात ठेवावे, असे निरनिराळ्या प्राचीन वास्तुशास्त्राच्या ग्रंथातून आणि पुराणातून सविस्तर शास्त्रोक्त माहिती देण्यात आलेली आहे ."तेज" म्हणजेच अग्नी तत्व होय! अग्नि तत्व म्हणजेच ऊर्जा, प्रकाश, उष्णता ,पचन, शिजणे, शिजवणे, प्रसिद्धी ,ज्ञान, आणि क्रोध, आत्मबल आत्मविश्वास इत्यादी अग्नी कोणाचा स्वामी शुक्र ग्रह होय आणि देवता अग्नी देव होय!
भवनातील आग्नेय कोणात अग्नि संबंधी स्वयंपाक घर करणे शुभावह होय. आणि मोकळ्या जागेत ट्रान्सफॉर्मर जनरेटर बॉयलर भट्टी इलेक्ट्रिकल इन्वर्टर इत्यादी घटकांचा विचार करता येतो केला जातो तो शुभ होय!
तथापि या कोणात चुकूनही मास्टर बेडरूम ,अंडरग्राउंड वॉटर टँक, विहीर ,बोरवेल ,पूजाघर ,मंदिर तिजोरी ,मुख्य दरवाजा ,घराचा विस्तार इत्यादी करू नये अन्यथा नातेसंबंध विच्छेद ,धनहानी ,देव देवतांचे आशीर्वाद नसणे ,गृहकलह असणे ,चिंता, विशाद, रोगाचे कारण, व्याधी गृहकल ह, घातपात-अपघात, शस्त्रक्रिया ,कर्ज ,कुप्रसिद्धी इत्यादी विविध समस्यांना जातकाला आणि जातकाच्या परिवारातील सदस्यांना सामोरे जावे लागते.
आग्नेय कोपऱ्यातील अग्नी तत्व म्हणजे केवळ स्वयंपाक घर नव्हे! अग्नी तत्वाचा बारकाईने विचार करता अग्नि देवतेची 3 रूपे म्हणजेच आधिभौतिक ~स्वयंपाकाचा अग्नी, यज्ञाचा अग्नी , वीज (अवकाशातील),
अध्यात्मिक~शरीरातील जठराग्नी ,बुद्धी ,डोळे ,पायातील ते ज, आणि आधि दैविक~अग्निदेव ...जो सर्व अग्नीवर नियंत्रण ठेवतो याचा विचार करावा लागतो . सारांश अग्नी तत्व म्हणजे ऊर्जा ,आणि परिवर्तनाची शक्ती होय! घराच्या/ भवनाच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यात त्याचा वास /निवास असतो. तिथे स्वयंपाक घर व अग्नीशी संबंधित कामे केल्याने शुक्र प्रसन्न होऊन भावनात सकारात्मक वातावरण ऊर्जा वर्तुळाकार फिरत राहते,,, सबब जातक आनंदी, व्याधी विरहित, जीवन जगतो.
अग्नि तत्व आणि वास्तुशास्त्र....
वास्तुशास्त्रात अग्नेय म्हणजेच ते जे तत्व मान्य आहे. ते उष्णता ,ऊर्जा, परिवर्तन ,पचन ,पाचन, आणि तेजस्वीतेचे प्रतिक मानले जाते .भवनात अग्नि तत्व असमतोल असेल तर वादविवाद आजार आर्थिक हानीला नेहमीच सामोरे जावे लागते अग्नी तत्व म्हणजे त्याचे स्वरूप जाणून घेणे होय !तेथे उष्णता ,प्रकाश ,ऊर्जा, आणि, रूपांतरणाची शक्ती होय! याचा रंग लाल नारंगी गुलाबी होय आणि अग्नी तत्व प्रसन्न असेल तर भवनात सकारात्मक वातावरण असते, बिघडले तर तात्काळ विनाश होय!
भवनातील अग्नी तत्वाचा विचार करता ते आग्नेय कोपऱ्यात म्हणजे पूर्व आणि दक्षिण दिशेच्या कोपऱ्यात असते याची व्याप्ती पूर्व दिशेचा दक्षिणेकडील अर्धा भाग आणि दक्षिण भिंतीचा पूर्वेकडेल अर्धा भाग याचा समावेश होतो . एका शिती वास्तुपुरुष मंडलाचा विचार करता, आग्नेय दिशेला अग्नी ,विथत ,पर्जन्य,भूषा इत्यादी देवतांची पदे येतात. केव्हांही, भवनात आग्नेय कोपरा वाढू नये अथवा संकुचित होऊ नये येथे अनावश्यक जलतत्त्वाचा साठा करून ठेवू नये अन्यथा चिंता विषाद रोग व्याधी आणि कर्जबाजारी पणास आमंत्रण होते.
बृहत्संहितेत,,, दक्षिण पूर्वे कोणाऽ ग्नी, असा वास्तुशास्त्राचा श्लोक येतो या कोपऱ्यात पाकशाला शुभ भाव मानली आहे.
आग्नेय: पावको भाग: पाक स्थानं प्रशस्यते|
अग्नि म्हणजे केवळ ज्वाला नाही दीपक पूजा यज्ञ स्वयंपाक सुरक्षा प्रकाश आत्मबल या सर्वांचा समावेश अग्नीमध्ये केला जातो.
ऋग्वेद~ अग्निर् ह्यग्ने प्रथम देवतानां,,, देवता मध्ये अग्नी देव हा पहिला आहे म्हणून पूजा ,दीपक ,सर्व अग्नी साक्षीनेच सुरू होते...
यजुर्वेद~ अग्नआयुंषि पवसे,,, आमचे आयुष्य पवित्र कर. अग्नि~ पवित्रता, दीर्घायुष्य सुरक्षा
चरक संहितेनुसार~अग्नीर्वै शरीरेषु तिष्ठति,,,
अग्नि शरीरात असतो, जोपर्यंत असतो तोपर्यंत व्यक्ती जीवित मानले जाते. आयुर्वेदात तेरा प्रकारचे अग्नी,,,~ जठराग्नी ~भूताग्नी ~धात्वाग्नी विवरण केलेले आहे . आयुर्वेदानुसार शरीरातील अग्नी बिघडला की पाचन पचन आरोग्य बिघडते सबब व्याधीस आमंत्रण मिळते.
विश्वकर्मा वास्तुशास्त्रात खालील वर्णिलेला श्लोक महत्त्वाचा ठरतो.
आग्नेय्यां पाकशाला च आग्नेयी सा प्र कीर्तिता|
यज्ञशाला तथै व स्यात् दीप श्चैव न संशय:||
आग्नेय दिशेत स्वयंपाक घर असावे तसेच यज्ञशाळा आणि दीपकही निःसंशयपणे तेथेच असावा कारण ती अग्नी तत्वाची दिशा व तेथील देवता अग्नी देव होय आणि स्वामी शुक्र होय....
म्हणजेच अग्नेय म्हणजे आग नाही, चूल नाही, दीपकाचा तो प्रकाश होय पूजेचे भक्ती होय यज्ञाचे पावित्र्य होय स्वयंपाकाचे ऊर्जा होय घराची सुरक्षा होय मनुष्याचे आत्मबल व आणि सकारात्मक ऊर्जा आग्नेय कोपऱ्यात या सर्व बाबींचा समावेश केला जातो सबब भवन निर्मिती करीत असताना अनुभवी उच्च विद्या विभूषित वास्तुशास्त्रज्ञाचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
सम्रांगण सूत्रधार या ग्रंथात खालील खालील श्लोकात विनोद गोड गोड अग्नी तत्व संतुलन कसे करावे याबद्दल विवरण दिलेले आहे.
यत्र यत्र भवेद् दोष स्तत्र प्रतिक्रिया|
तत्वा
नां स्थापना देव दोष नाश:; प्रजायते ||जेथे आग्नेय कोपऱ्यात दोष असेल तेथे भवनात तुपाचा दीप लावला तरीही तत्त्वाची स्थापना तेथे होते. विश्वकर्मा प्रकाश या प्राचीन वास्तुशास्त्राच्या ग्रंथातून खालील श्लोक आढळून येतो आग्नेय्यां चुल्ली कार्या, नैऋत्यशयनं गृहे|
ईशान्या देवतांगारं, वायव्ये च धनस्मृतम||{आग्नेय कोपऱ्यात स्वयंपाकघर ,नैऋत्य कोपऱ्यात शयन कक्ष ईशान्येला मंदिर आणि वायव्येला धनासंबंधी (?) बाबी ठेवाव्यात.}
मत्स्यपुराणात खालील श्लोक दिलेला आहे,,
प्रासादे यत्र दोषा: स्यात् तत्राग्नेयीं प्रकल्प येत्|
यज्ञ कुण्ड च वा कुर्यात दोष शात्नी र्भवेद् ध्रुव म्||{भवनात घरात मंदिरात दोष असेल तेथे अग्नी देवाची स्थापना करावी किंवा यज्ञ कुंड करावे .
अग्निपुराणातून खालील श्लोक आढळून येतो.
अग्नी स्थापन मात्रेण सर्व दोष विनाश नम्|
दीपं प्रज्वाल्य तत्रेव शुक्र: प्रीणाति नित्य श:||{केवळ शुद्ध तुपाचा दिवा लावल्याने शुक्र ग्रह नित्य प्रसन्न राहतो}
अग्नी कोण स्वयंपाक घर अग्नी ऊर्जा या संबंधांमध्ये हा माझा कॉपीराईट लेख आपल्या ला अभ्यासासाठी पाठवीत आहे.
पंडित प्रदीप , कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक मान्यता प्राप्त आणि श्री श्री युनिव्हर्सिटी ओडीसा मान्यताप्राप्त वास्तुविद्या मार्गदर्शक सल्लागार आणि प्रशिक्षक, पानाडी, जिओ पॅथिक कन्सल्टंट, रमल अभ्यासक, संपर्कक्रमांक9890325866.
Unlock Success: 10 Simple Vastu Tips for Your Home Office Table of Contents Working from home has become the new norm for many. While it can be enjoyable, balancing work with household chores can sometimes be stressful. Here are Vastu tips for your home office, to help you transform your workspace into a productivity powerhouse. Crafting an effective home office is not just about setting up a desk and chair— it’s about creating a productive environment that fuels your success . Before we delve into Vastu tips, here are some general strategies to transform any dull space into a powerhouse of productivity. 1. Establish Your Workspace: Your home office should be a distinct area, separate from where you perform household chores. This separation helps maintain focus and reduces distractions. Ample lighting is essential for a vibrant workspace. Ensure your area is well-lit with natural or artificial light to boost energy levels and reduce eye strain. Now, let’s harness ...
Comments
Post a Comment