*शरीराला आवश्यक असणाऱ्या खनिजा विषयी सविस्तर माहीती
*कॅल्शिअम कशात असतं? *
शेंगदाणे, तीळ, दूध, खोबरं, मुळा, कोबी. ज्वारी, राजगिरा, खरबूज, खजूर.
*कमतरतेमुळे काय होतं? *
हृदयरोग, ऑस्टियोपोरोसिस, दंतरोग, केस गळणे.
*कार्य काय असतं? *
शरीरातील सर्वात मुख्य खनिजं असून ते हाडांची मजबुती आणि शरीराच्या निर्मितीसाठी आवश्यक असतं.
*लोह कशात असतं? *
खजूर, अंजीर, मनुका, सफरचंद, डाळिंब, पालक, सीताफळ, उस, बोर, मध, पपई आणि मेथी.
*कमतरतेमुळे काय होतं? *
शरीरात रक्ताची कमतरता भासते. अशक्तपणा, कावीळ किंवा पोटात मुरडा येतो.
*कार्य काय असतं? *
शरीराच्या वाढीसाठी अतिशय आवश्यक असते.
*सोडिअम कशात असतं? *
मीठ, पाणी, बटाटा, आलं, लसूण, कांदा, मिरची, पालक, सफरचंद, कारलं.
*कमतरतेमुळे काय होतं? *
रक्तदाबाशी निगडित समस्या, निद्रानाश, अंगदुखी, अपचन, मूळव्याधीसारखे आजार, मोतीबिंदू, बहिरेपणा, हात अणि पाय कडक होणे.
*कार्य काय असतं? *
शरीराला आवश्यक असणारी पाचक रसायनाची निर्मिती करतात, त्याचप्रमाणे शरीरात होणारा गॅस नष्ट होतो.
*आयोडिन कशात असतं? *
शिंघाडा, काकडी, कोबी, राजगिरा, शतावरी, मीठ आणि लसूण.
*कमतरतेमुळे काय होतं? *
थायरॉइडची समस्या, केस गळणे, डिप्रेशन किंवा बैचेनी येणे.
*कार्य काय असतं? *
शरीरात उत्पन्न होणाऱ्या विषारी पदार्थापासून मेंदूला बचावण्याचं काम करतो.
*पोटॅशिअम कशात असतं? * सर्व प्रकारची धान्य, डाळ, संत्र, अननस, केळं, बटाटा, लिंबू, बदाम.)
*कमतरतेमुळे काय होतं? *
अॅसिडिटी, त्वचेवर सुरकुत्या किंवा मुरुमं येणं, त्वचा रोग, केस पिकणे.
*कार्य काय असतं? *
शरीरात तंतू आणि यकृत यांना सुरळत ठेवण्याचं कार्य करतं.
*फॉस्फरस कशात असतं? *
दूध, पनीर, डाळी, कांदा, टोमॅटो, गाजर, जांभळं, पेरू, काजू, बदाम, बाजरी आणि चणे.
*कमतरतेमुळे काय होतं? *
ऑस्टिओपोरोसिस, गतिमंद होणे, मानसिक थकवा, दंत रोग.
*कार्य काय असतं? *
मेंदूला ताजंतवानं ठेवण्याचं काम हे खनिजं करतं.
*सिलिकॉन कशात असतं? *
गहू, पालक, तांदूळ, कोबी, काकडी, मध,
*कमतरतेमुळे काय होतं? *
कॅन्सर, त्वचारोग, बहिरेपणा, केस गळणे.
*कार्य काय असतं? *
जननेंद्रियांची कार्यक्षमता वाढवून शरीरातील तंतूना मजबूत करतात.
*मॅग्नेशिअम कशात असतं? * बाजरी, बीट, खजूर, सोयाबीन, दूध, लीची, कारलं.
*कमतरतेमुळे काय होतं? *
उदास होणे, आळस येणे, तणाव असणे, झोप न लागणे, बैचेनी, सोरायसिस, फोडं, नपुंसकता किंवा वांझपणा.
*कार्य काय असतं? *
पेशीचं कार्य सुधारतं. रेचक म्हणून काम करतं.
*सल्फर कशात असतं? *
दूध, पनीर, डाळ, टोमॅटो, बटाटा, आलं, मिरची, सफरचंद, अननस, सुरण.
*कमतरतेमुळे काय होतं? *
प्रतीकारशक्ती कमी होते, केस गळतात, वजन वाढतं, मधुमेहाला आमंत्रण मिळतं.
*कार्य काय असतं? *
इन्सुलिनचं रेचन म्हणून कार्य करतं.
*क्लोरिन कशात असतं? *
पाणी, बीट, कोबी, मीठ, दूध, लिंबू, आवळा, मध.
*कमतरतेमुळे काय होतं? *
अॅसिडिटी, अल्सर, कॅन्सर, आणि अॅलर्जी.
*कार्य काय असतं? *
सोडिअम आणि पोटॅशिअमला पाचक बनवण्यासाठी सहायता करतं, त्याचप्रमाणे शरीरातील आम्लक्षाराचं संतुलन राखलं जातं.
*खाद्यपदार्थामधील खनिजं शरीराला मिळावीत म्हणून काय केलं पाहिजे...*
*फळं किंवा भाज्या कापल्यानंतर कधीच धुवू नयेत. असं केल्याने त्यातील खनिजं पाण्यावाटे नष्ट होतात.
*डाळ, तांदूळ किंवा धान्यदेखील उकडण्यापूर्वीच स्वच्छ धुऊन घ्यावेत.
*काही धान्य, फळं तसंच भाज्यांच्या सालींमध्ये खनिजांचा मोठा प्रमाणावर साठा असतो. त्यामुळे अशा सालींचा आहारात समावेश करावा.
*दुधात खनिजांचा भरपूर स्रेत असतो म्हणूनच दूध जास्त प्रमाणात उकळू नये. दूध जास्त प्रमाणात उकळल्याने त्यातील खनिजं नष्ट होतात.
*फळं कापून खाण्याऐवजी शक्यतो आहे तशीच खावीत. उदाहरणार्थ, चिकू किंवा सफरचंद ही फळं संपूर्ण खावीत.
Compiled by
Vikas P Deshpande
M. E. Civil, Structural Engineer.
Vastu Consultant, Feng Shui Consultant
34, Botany Boulevard, Kings Langley,
NSW-2147, Australia
Phones: +610434681647 (Sydney)
UTTARABODHI MUDRA Uttarabodhi Mudra, meaning "highest enlightenment," is a yogic hand gesture that promotes mental strength, relaxation, and spiritual awakening by directing energy upwards and stimulating the heart, lungs, and thymus gland. Here's a more detailed explanation: Meaning and Significance: "Uttara": means "upward" or "highest". "Bodhi": means "enlightenment" or "awakening". The mudra symbolizes the upward movement of energy and the awakening of consciousness. It's believed to enhance self-confidence, calm the mind, and improve problem-solving and decision-making abilities. How to Practice: Find a comfortable seated position: You can sit in Sukhasana (easy pose) or Padmasana (lotus pose). Close your eyes: and take a few deep breaths. Bring your palms to the navel centre or heart centre: Interlock your fingers, leaving the index fingers and thumbs extended. Touch the tips o...
Comments
Post a Comment