Mani pura chakra
|
मणिपूर चक्र आणि रामरक्षा--- एक अभ्यास! यासह
खाली रामरक्षा देतो आहे! अप्रतिम लेख आहे. कृपया वाचा आणि आचरणात आणा! धन्यवाद!
लेख---चंद्रकांत कुरे बडोदे!
हे चक्र नाभिस्थानाजवळ असते.
ह्याला दहा पाकळ्या असून *सत्वगुणात्मक सृष्टीचे
पालन करणारा विष्णु* याची अधिष्ठात्री देवता आहे.
२) शरीराचा मध्य बिंदू अर्थात *गुरुत्वमध्य*
ह्याच चक्रात असतो.
३) ह्या चक्रावर *धारणा* केल्याने चित्तात
सत्वगुण वाढून ते स्थिर होऊ लागते.
४) *धारणा म्हणजे काय?* चित्ताची स्थिरता म्हणजे
धारणा...
*धारणा, ध्यान आणि समाधी या तीन्ही भिन्न गोष्टी आहेत.*
अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर *धारणा म्हणजे concentration*... किंवा *एकाग्रता*
५) *चित्त शरीरांतील एखाद्या भागावर स्थिर
ठेवण्याचा अभ्यास करणे म्हणजे धारणेचा अभ्यास करणे होय*
६) *महत्त्वाचं*--- एकदा आपल्याला आपल्या
चक्रांचं शरीरातील स्थान माहीत झाले की त्या स्थानावर धारणा केली (त्या स्थानावर
आपलं चित्त एकाग्र केलं) की त्या *चक्रावर ती धारणा* केली असं म्हणतात.
७) ज्या नाडीचक्रावर आपण चित्त स्थिर केलं
(धारणा केली) की *त्या चक्रांतील नाड्यांचे आणि त्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या
इंद्रियांचे व्यापार सुसूत्रपणे चालू लागतात.*
उदाहरणार्थ , आपल्या शरीरातील खालील
अवयव/ग्रंथी *मणिपूर चक्राच्या नियंत्रणाखाली असतात*(आणि याचे आपल्याला अजिबात
ज्ञान नसते) ..
-Liver
-Pancreas
-Small Intestine
-Kidney
- *Adrenal Gland*
-Gall bladder
*आता मणिपूर चक्र बिघडलं की त्यासंबंधीत होणारे रोग पाहू या*-----
-Indigestion
-Diabetes
-Acidity
-Ulcer
-Colitis
-Appendicitis
-Kidney Stone
-Nephropathy.
मी वर उल्लेख केला आहे Adrenal Glands चा आणि त्याला bold केलं आहे...
या glands खूप महत्त्वाचे हॉर्मोन्स
निर्माण करतात त्यांचं नाव आहे--- adrenaline आणि cortisol... Adrenaline च़ level बिघडलं की खालील परिणाम होतात----
High Blood Pressure
High Blood Sugar
Depression
एखादी वाईट बातमी आली की आपले हृदयाचे ठोके
वाढतात, बीपी वाढतं, भीति वाटते, excitement वाढते, anxiety वाढते.... *ते कश्यामुळे ?????* तर त्यावेळी आपल्या Adrenal Glands खूप उत्तेजित होतात म्हणून. *यालाच आपण म्हणतो पोटात खड्डा पडला किंवा
छातीत धस्सं झालं.*
*हा आघात आपल्या मणिपूर चक्रावर होतो*, हृदयावर नाही... *पण त्याचे
परिणाम हृदयावर होतात*
*मग ते pressure
release करायला लगेचच आपल्या systems activate होतात... काही लोकांना लगेच urine pass होतं , काही लोकांना तर लगेच शौचास
जावे लागते... *असं झालं की समजावं की तुमच्या systems व्यवस्थित काम करत आहेत.*
अश्या परिस्थितीत आपण लगेच *रामरक्षा स्तोत्र*
म्हणायला सुरुवात करतो.... *खरं ना ?????*
*तर रामरक्षा च कां?*
मणिपूर चक्राचं बीज अक्षर आहे *रं*
*रं* चा वारंवार उच्चार केल्याने आपलं मणिपूर चक्र आहत होतं आणि त्याच्याशी
संलग्न असलेल्या सर्व इंद्रिये / ग्रंथी उत्तेजीत होतात... सोप्या भाषेत सांगायचे
तर charge होतात व त्यातून निघणारा स्त्राव regulated/ नियंत्रित होतो... परंतु
नुसतं एकसारखे *रं* म्हणत राहिलो की कंटाळायला होईल.... आपल्या ऋषीमुनींना याचं
पक्क ज्ञान होतं.... *म्हणून त्यांनी रामरक्षा स्तोत्राची रचना केली*..
*रामरक्षेत किती वेळा *र* अक्षर येतं ते मोजून पहा... त्याची आवर्तनं केलीत
तर किती वेळा *र* चा उच्चार होईल याची कल्पना करा !!!! मग किती वेळा आपलं मणिपूर
चक्र आहत होईल याचा विचार करा.
*परंतु आपण यांत्रिक पणे रामरक्षा म्हणत राहतो त्यामुळे जितका फायदा व्हायला
हवा तितका होत नाही* ...... कारण आपण आधीच बघितलं आहे की कुठल्याही चक्राला *activate करायचं असेल तर त्याच्यावर *धारणा* करायची असते...
*आपण रामरक्षा म्हणताना डोळे मिटून मणिपूर चक्रावर आपलं चित्त एकाग्र केलं
तर निश्र्चितच आपलं चक्र activate होईल आणि सतत *र* अक्षराच्या
उच्चाराने *निर्माण होणारी energy , त्या चक्रांतील नाड्यांचे आणि
त्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या इंद्रियांचे शुद्धीकरण व बळकटीकरण करेल...
परिणामी त्याला संलग्न असलेले आजार पण मिटतील.*
यापुढे रामरक्षा म्हणण्यापूर्वी -
*१)एका जागी स्वस्थ बसा*
(घरात इकडे तिकडे डुलत डुलत, घरातली कामं करताना, स्वयंपाक करताना रामरक्षा
म्हटली तर त्याचा मणिपूर चक्रावर काहीच सकारात्मक परिणाम होणार नाही)
*२) डोळ्यासमोर श्रीरामाची मूर्ती आणा ,*
*३) मणिपूर चक्रावर चित्त एकाग्र करा...*
*४) नंतर रामरक्षा पठण सुरु करा*
*५) ९० दिवसांत आपल्या मणिपूर चक्राशी संबंधित organs वर काय positive फरक वाटतोय ते observe करा....*
*टीप: ---*
*योग, मेडीकल सायन्स आणि अध्यात्म असा हा समन्वय आपणास कुठल्याही पुस्तकात
रेडीमेड मिळणार नाही..*. परत परत हा लेख वाचून समजून घ्या आणि अंमल करा....
*दत्त प्रभु आपणास सर्वांना उत्तम स्वास्थ्य देवो हीच माझी प्रार्थना*
*श्री गुरुदेव दत्त*
रामरक्षा म्हणा...!
रोजच्या जीवनातील कुठल्याही प्रहरी रामरक्षा
म्हंटली तरी प्रचंड प्रमाणात ऊर्जा तयार होते. जी स्पंदने रामरक्षेतून जागृत होतात, ती दाखविण्यासाठी कुठलाही
चश्मा किंवा भींग उपलब्ध नाही, परंतु "स्वानुभव"
ह्या एकमेव साधनातून याची प्रचिती येते.
घरात एकटे आहात, रामरक्षा म्हणा, कुणी आजारी आहे, त्याच्या बाजूला बसून
रामरक्षा म्हणा, प्रवासात आहात, रामरक्षा म्हणा, रस्त्यावरुन एकटे जात आहात, रामरक्षा म्हणा, पहिल्यांदाच प्रेजेंटेशन
देणार आहात, रामरक्षा म्हणा, नविन देशात अनोळखी लोकांच्यात
आहात... रामरक्षा म्हणा...!
आत्तसज्जधनुषा विषुस्पृशा वक्षया शुगनिषङ्ग सङिगनौ
।रक्षणाय मम रामलक्ष्मणा वग्रत: पथि सदैव गच्छताम् ॥२०॥ हा श्र्लोक म्हणताना
अंगावर उभा राहणारा काटा अनुभवण्यासारखा असतो.
कुठल्याही संकटात असाल, फारच निगेटिव वाटतंय, आपल्या आवडत्या व्यक्तिशी
भांडण झालंय, खूप वाईट वाटतंय, रडायला येतंय, एकटं वाटतंय, रामरक्षा म्हणा. कुठल्याही
प्रकारचं डिप्रेशन तुम्हाला कधीच येणार नाही. आत्महत्येचे विचार मनाला शीवणारही
नाहीत..
आस्तिक असाल, नास्तिक असाल तरीही रामरक्षा
म्हणा. देवावर नसेल विश्वास पण रामरक्षेवर ठेवा. मोबाईल वर ऐकत असाल तरीही तोंडाने
म्हणा. चारचौघात असाल तरीही मध्यमेतून म्हणा.
रामरक्षा असा एक रामबाण उपाय आहे, जो तुमचे बारा कधीच वाजू
देणार नाही. पटत नसेल तर आजपासून अनुभव घ्यायला सुरुवात करा.
विनियोग:
अस्य श्रीरामरक्षास्त्रोतमन्त्रस्य बुधकौशिक
ऋषिः। श्री सीतारामचंद्रो देवता। अनुष्टुप छंदः। सीता शक्तिः। श्रीमान हनुमान
कीलकम। श्री सीतारामचंद्रप्रीत्यर्थे रामरक्षास्त्रोतजपे विनियोगः।
ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपदमासनस्थं
पीतं वासो वसानं नवकमल दल स्पर्धिनेत्रम् प्रसन्नम। वामांकारूढ़ सीता
मुखकमलमिलल्लोचनम् नीरदाभम् नानालंकारदीप्तं दधतमुरुजटामण्डलम् रामचंद्रम ।।
राम रक्षा स्तोत्र:
चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् ।
एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् । 1।
ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम् ।
जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं ।2।
सासितूणधनुर्बाणपाणिं नक्तंचरान्तकम्। स्वलीलया
जगत्त्रातुमाविर्भूतमजं विभुम् ।।3।।
रामरक्षां पठेत प्राज्ञः पापघ्नीं सर्वकामदाम्।
शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः ।। 4।।
कौसल्येयो दृशो पातु विश्वामित्रप्रियः श्रुति।
घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः ।।5।।
जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः।
स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः ।।6।।
करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित। मध्यं
पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः ।।7।।
सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः। उरु
रघूत्तमः पातु रक्षःकुलविनाशकृताः ।।8।।
जानुनी सेतुकृत पातु जंघे दशमुखांतकः। पादौ
विभीषणश्रीदः पातु रामअखिलं वपुः ।।9।।
एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृति पठेत। स
चिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् ।।10।।
पातालभूतल व्योम चारिणश्छद्मचारिणः। न
द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः ।।11।।
रामेति रामभद्रेति रामचंद्रेति वा स्मरन। नरौ न
लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति ।।12।।
जगज्जैत्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितम्। यः
कण्ठे धारयेत्तस्य करस्थाः सर्वसिद्धयः ।।13।।
वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत।
अव्याहताज्ञाः सर्वत्र लभते जयमंगलम् ।।14।।
आदिष्टवान् यथा स्वप्ने रामरक्षामिमां हरः। तथा
लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः ।।15।।
आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम्।
अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान स नः प्रभुः ।।16।।
तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ।
पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ ।।17।।
फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ। पुत्रौ
दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ ।।18।।
शरण्यौ सर्वसत्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम्।
रक्षःकुलनिहन्तारौ त्रायेतां नो रघूत्तमौ ।।19।।
आत्तसज्जधनुषाविषुस्पृशा वक्ष
याशुगनिषङ्गसङ्गिनौ। रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रतः पथि सदैव गच्छताम ।।20।।
सन्नद्धः कवची खड्गी चापबाणधरो युवा। गच्छन्
मनोरथान नश्च रामः पातु सलक्ष्मणः ।।21।।
रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली। काकुत्स्थः
पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघूत्तमः ।।22।।
वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः।
जानकीवल्लभः श्रीमानप्रमेयपराक्रमः।।23।।
इत्येतानि जपन नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः।
अश्वमेधाधिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः ।।24।।
रामं दुर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससम।
स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्न ते संसारिणो नरः ।।25।।
रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं
काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम।
राजेन्द्रं सत्यसंधं दशरथतनयं श्यामलं
शांतमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिम।।26।।
रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे। रघुनाथाय
नाथाय सीतायाः पतये नमः ।।27।।
श्रीराम राम रघुनन्दन राम राम। श्रीराम राम
रणकर्कश राम राम। श्रीराम राम शरणं भव राम राम ।।28।।
श्रीराम चन्द्रचरणौ मनसा स्मरामि श्रीराम
चंद्रचरणौ वचसा गृणामि। श्रीराम चन्द्रचरणौ शिरसा नमामि श्रीराम चन्द्रचरणौ शरणं
प्रपद्ये ।।29।।
माता रामो मत्पिता रामचन्द्रः स्वामी रामो
मत्सखा रामचन्द्रः । सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर्नान्यं जाने नैव जाने न जाने
।।30।।
दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे च जनकात्मज। पुरतो
मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम् ।।31।।
लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं।
कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये ।।32।।
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां
वरिष्ठम। वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीराम दूतं शरणं प्रपद्ये ।।33।।
कूजन्तं रामरामेति मधुरं मधुराक्षरम। आरुह्य
कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम ।।34।।
आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदाम्। लोकाभिरामं
श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् ।।35।।
भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसम्पदाम्। तर्जनं
यमदूतानां रामरामेति गर्जनम् ।।36।।
रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः।
रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोस्म्यहं
रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धराः।।37।।
राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे। सहस्त्रनाम
तत्तुल्यं रामनाम वरानने ।।38।
Comments
Post a Comment