TYLIN
तोंडातील लाळ अनेक आजारांवर गुणकारी*
आपण लहानपणी खेळताना पडलो आणि लहानमोठे खरचटले की तोंडातील लाळ म्हणजेच थुंकी काढून लागलेल्या जागी लावून पुन्हा लगेच खेळायला लागायचो. पण जसं जसे आपण मोठे होत गेलो, तस तसे आपण या गोष्टी विसरलो, आणि मग प्रत्येक वेळी डॉक्टरच्या फेऱ्या मारायला लागलो. या झाल्या लहानपणीच्या गोष्टी. पण आज आपण येथे याच विनामुल्य औषधाचे फायदे आणि त्याचा वापर कसा करावा हे पाहणार आहोत.
खालील माहीती ही श्री राजीव दीक्षित यांनी सांगितली आहे. खाली सांगितलेले सर्व उपाय करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी दात स्वच्छ करून झोपा आणि सकाळी उठल्यावर दात न घासता, गुळणी न करता आणि तोंडातील लाळ (थुंकी) बाहेर न फेकता सर्वात पहिले खालील उपायासाठी वापरा. तोंडातील लाळ ही शरीरासाठी अमृता समान आहे. तुम्हाला कितीही मोठ्या नंबरचा चष्मा असो खालील उपाय केल्याने हळूहळू चष्म्याचा नंबर कमी होण्यास सुरुवात होते आणि एक दिवस तुम्हाला बिना चष्म्याचे सामान्य दिसायला लागते.
तुम्हाला चष्मा असेल, तर तर सकाळी उठल्यावर गुळणी न करता किंवा दात न घासता तोंडातील थुंकी आपण डोळ्यांना काजळ लावतो त्यापद्धतीने डोळ्यांना लावा. अशी थुंकी रात्री झोपताना आणि सकाळी ५ वाजता लावा, कारण त्यानंतर १-२ तासांनी आपण तोंड धुतले, अंघोळ केली, तर तो पर्यंत लाळेने आपले काम केलेले असेल. हा प्रयोग अत्यंत यशस्वी आहे आणि १००% तुमचा चष्मा घालवणारा आहे. पण यासाठी नियमित हा उपाय करायचा आहे. हळूहळू चष्म्याचा नंबर शून्य होण्यास सुरुवात होते आणि लाळेचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही. तसेच लाळ डोळ्यांची नजर (६/६) ने वाढवतो. जर डोळ्यांच्या खाली काळे वर्तुळे असतील तर सकाळी उठल्यावर लाळेने हळूहळू मालिश करा, यामुळे डोळ्या खालील काळे वर्तुळ हळूहळू कमी होऊन त्वचा सामान्य होते, हा प्रयोग १-२ महिने दररोज करावा
डायबिटीज झालेल्या लोकांना जर जखम झाली असेल तर ती बरी होत नाही, आणि जखम वाढल्यामुळे अनेक वेळा अवयव कापण्या पर्यत दुखणे वाढते. त्यामुळे हा साधा आणि सोप्पा उपाय अनेक लोकांना अपंग होण्या पासून वाचवणारा होऊ शकतो. जर डायबिटीज झालेल्या व्यक्तीस जखम झाली असेल तर सकाळी उठल्यावर तोंडातील लाळ जखम झालेल्या जागी लावावी, यामुळे घाव हळूहळू भरण्यास सुरुवात होते. ज्या लोकाना भाजल्यामुळे चटका लागल्यामुळे त्वचेवर काळा डाग पडला असेल, त्यांनी सकाळी लाळेने डाग पडलेल्या जागी मालिश करावी. यामुळे डाग हळूहळू फिका पडेल आणि त्वचेच्या रंगा सारखा सामान्य होईल. ज्या लोकाना खाज खरुज झाली असेल त्यांनी दररोज सकाळी लाळ विना गुळणी करता इन्फेक्शन झालेल्या जागी लावावी, बघता बघता त्वचा सामान्य होईल
अशा पद्धतीने लाळ अनेक आजारांवर गुणकारी आहे. तोंडातील लाळे मध्ये आहे तरी काय? टायलीन नावाचे एंजाइम लाळेत असते जे आपल्या पचनशक्तीला वाढवते. पण जर तुम्ही गुटखा, तंबाखू खाता आणि सारखे थुंकत असाल तर हळूहळू ही लाळ तयार होणे बंद होते आणि तोंडाचा कैन्सर होण्याची भीती वाढते. या लाळेचा PH मानक ८.३ असतो. सोबतच आपण जे सकाळी टूथपेस्ट करतो ते बंद केले पाहिजे, कारण यामुळे लाळ आपण थुंकतो. या ऐवजी कडुलिंब किंवा बबुलने दात घासा. असे दात स्वच्छ केल्यामुळे ही लाळ सर्वाधिक तयार होते. जर तुम्ही कडुलिंब किंवा बबुलच्या काडीने दात घासणार असाल, तर जेवढी काडी वापरली आहे तेवढी कापून टाका आणि उरलेली पाण्यात ठेवा, दुसऱ्या दिवशी सकाळी त्या काडीने दात स्वच्छ करा.
Comments
Post a Comment