TULSI LEAVES

तुळशीची पाने रोज चावून खा! अनेक आजारांवर असरदार, पावसाळ्यात तर फार उपयोगी...*

 

आपल्याकडे तुळशीच्या रोपाला अत्यंत महत्वाचे मानले जाते. धार्मिक आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातून तुळस ही एक बहुगुणी औषधी वनस्पती आहे. तिच्या पानांत असलेल्या औषधी घटकांमुळे ती शरीरासाठी अनेक प्रकारे लाभदायक ठरते. विशेषतः तुळशीची पाने चावून खाणे ही एक पारंपरिक आणि नैसर्गिक आरोग्यवर्धक पद्धत मानली जाते.

 

तुळशीच्या पानांत अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल, अँटीऑक्सिडंट आणि अँटीइंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे ही पाने चावून खाल्ल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते, श्वसन संस्थेस मदत होते आणि पचनसंस्था सुधारते. या सर्व कारणांमुळेच तुळशीची पाने चावून खाणे ही एक नैसर्गिक आणि सुरक्षित  सवय ठरते. 

 

*तुळशीच्या पानांत नैसर्गिक औषधी गुण असून सर्दी-खोकला आणि ताप यांपासून संरक्षण मिळते, तसेच त्वचेचे आणि पचनाचे कार्य सुरळीत चालण्यास मदत करते. तुळशीमध्ये जीवनसत्त्वे सी, , के आणि बी-कॉम्प्लेक्स, अँटिऑक्सिडंट्स, प्रथिने, फायबर, ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड, कॅल्शियम, लोह आणि मॅग्नेशियम असे विविध पोषक घटक असतात*, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. यासाठीच, अशा या बहुगुणी औषधी तुळशीची पाने चावून खाण्याचे फायदे कोणते आहेत ते पाहूयात... 

 

*तुळशीची पाने चावून खाल्ल्याने होतात अनेक फायदे*... 

 

1. *रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी*:- तुळशीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म जास्त प्रमाणात असतात, त्यामुळे ती रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते. तुळशीचा अर्क रोगप्रतिकारक पेशींची क्रियाशीलता वाढवतो, ज्यामुळे शरीराचे संक्रमण आणि रोगांपासून संरक्षण होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण तुळशीच्या ताज्या पानांचा रस रोज पिऊ शकता. 

 

2. *बीपी आणि शुगरच्या रुग्णांसाठी फायदेशीर*:- तुळस त्याच्या अँटिऑक्सिडंट गुणधर्मांमुळे, रक्तदाब आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर मानली जाते. क्लीव्हलँड क्लिनिकनुसार , संशोधनातून असे दिसून आले आहे की तुळशीचा रक्तातील साखर कमी करणे आणि रक्तदाब सुधारणे यासह अनेक चयापचय प्रक्रियांवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.

 

3. *हृदयाचे आरोग्य वाढवते*: - तुळशीची पाने हृदयाशी संबंधित अनेक समस्या टाळण्यास देखील मदत करतात. तुळशीची पाने रक्तातील साखर, रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल सुधारून हृदय निरोगी ठेवतात.

 

4. *स्ट्रेसपासून मिळेल आराम*: - तुळशीची पाने चावून खाल्ल्याने आपले मानसिक आरोग्य सुधारण्यास देखील मदत होईल. खरंतर, तुळशीमध्ये अ‍ॅडॉप्टोजेन गुणधर्म असतात. तुळशीतील हा असा एका नैसर्गिक गुणधर्म आहे, जे शरीराला ताणतणावाचा सामना करण्यास आणि मानसिक संतुलन वाढविण्यास मदत करतात.

 

5. *शरीरातील एनर्जी वाढवण्यासाठी*: - शरीरातील थकवा दूर करण्यासाठी आणि ऊर्जा वाढवण्यासाठी तुळशीच्या पानांचा वापर केला जातो. तुळशीमुळे शरीरातील ऊर्जा वाढते, यासाठी रोज तुळशीचे पाने चावून खाल्ल्याने अनेक फायदे तर होतात सोबतच शरीरातील एनर्जी देखील वाढते.

.

6. *सर्दी आणि खोकल्यापासून आराम*:- आयुर्वेदात, तुळशीला खोकला, सर्दी आणि दमा यांसारख्या श्वसनाच्या आजारांवर प्रभावी उपाय मानले जाते. 

 

 

Comments

Popular posts from this blog