BADHAKOSHTHTA

*बद्धकोष्ठतेवर नियमित पोट स्वच्छ न होणे काही घरगुती उपाय*

*नियमित पोट स्वच्छ होणे हे निरोगी आरोग्याचे गमक आहे. मात्र आधुनिक जीवनशैली , खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी आणि वेळा यांमुळे बद्धकोष्ठ्ता जडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.*

*नियमित पोट स्वच्छ होणे हे निरोगी आरोग्याचे गमक आहे. मात्र आधुनिक जीवनशैली, खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी आणि वेळा यांमुळे बद्धकोष्ठ्ता जडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. योग्य वेळी बद्धकोष्ठ्तेवर उपचार केले नाहीत तर यातून 80 प्रकारचे वेगवेगळे आजार संभवू शकतात.*

*मग कराच बद्धकोष्ठतेवर काही घरगुती उपाय. *

*तुप*

*तुप हा फार जुन्या बद्धकोष्टतेवर रामबाण उपचार आहे. तुपा मुळे  आतड्यातील कार्य शक्ती वाढून  पोटाच्या अनेक समस्या दुर होण्यास मदत होते. जेवणाच्या वेळी एक चमचा तुप हे उत्तम आरोग्य ठेवुन आजार दुर होतात दररोज ग्लासभर दुधात दोन चमचे तुप एकत्र करून रात्री प्यावे.     बद्धकोष्ठतेचा त्रास  दूर होईल.*

*एरंडेल तेल*

*एरंडेल तेल हा बद्धकोष्ठतेवरील फार जुना उपचार आहे. या तेलामुळे  आतड्यातील जंतू मरतात. जर तुम्हाला एक चमचा एरंडेल तेल पिणे शक्य नसल्यास ते ग्लासभर दुधात एकत्र करून रात्री प्यावे. आतड्याच्या धीम्या कार्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास संभवतो तो दूर होईल.*

*अंजीर. *

*सुके वा ओले अंजीर दोन्ही नैसर्गिकरीत्या रेचक असल्याने बद्धकोष्ठतेवर फारच गुणकारी आहेत.  त्यातून शरीराला पुरेसे फायबर मिळतात. बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी काही अंजीर दुधात उकळा हे मिश्रण रात्री प्यावे. बाजारात मिळणाऱ्या रसापेक्षा अख्खे  अंजीर खाणे अधिक फलदायी ठरेल.*

*जवस (आळशी)*

*आळशी तुम्हाला फायबर तर पुरवतेच पण बद्धकोष्ठतेवरही अतिशय गुणकारी आहे. दररोज एक चमचा आळशी तुम्ही अन्य  अन्नधान्या सोबत एकत्र करून  नाश्त्याला खाऊ शकता अथवा पावडर करून  गरम पाण्यासोबत घेऊ शकता. भाजुन मीठ लावून बडीसोप प्रमाणे खाऊ शकता.*

Vikas P Deshpande

M. E. Civil, structural Consultant

Vastu and Feng Shui Consultant

0434681647, deshpandevikas@gmail.com

 

Comments

Popular posts from this blog