बटाटा एक औषधी कंद*
निसर्गाने मानवाला भेट दिलेल्या प्रत्येक वस्तूत औषधी गुणधर्म आहेत याचा प्रत्यय आपण प्रत्येक वस्तूचा निटपणे अभ्यास केल्यास येतो.आज आपण अशाच एका कंदाचा म्हणजे बटाट्याचा अभ्यास केल्यानंतर अढळून आलेले औषधी गुणधर्म आपल्या पुढ्यात मांडणार आहोत.चला तर मग सुरुवात करुया.
बटाट्याचे मुळ उगमस्थान दक्षिण अमेरीकेतील पेरु हे आहे. तेथून नंतर हे पीक जगभरात पोहचले.गहू, तांदूळ, धान,मका या नंतर सगळ्यात जास्त उत्पादन घेतले जाणारे पीक म्हणजे बटाटा.चीन,रशिया नंतर भारतात मोठ्या प्रमाणात पिकवले जाणारे पिक आहे. उत्तरप्रदेशात याच मोठ्या प्रमाणात पिक घेतले जाते.बटाटा हे संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणावर खाल्ले जाणारे जमिनीखाली येणारे एक पीक आहे. बटाटा हे त्याच्या रोपाचे खोड आहे.बटाट्याचे ही दोन प्रकार असतात एक भाजीचा तर दुसरा वेफर्स वगैरे करण्यासाठी वापरला जातो यासाठी महाराष्ट्रातील सातगाव पठारावर याचे उत्पादन होते.. त्या बटाट्यांना तळेगाव बटाटा म्हणतात. पुण्यापासून ६० किलोमीटवरचे सातगाव पठार. सात गावांचे मिळून बनले आहे, म्हणून त्याला सातगाव पठार म्हणतात. इथले 'तळेगाव बटाटे' देशभरात प्रसिद्ध आहे. इथे वातावरण बटाटा पिकासाठी अत्यंत पोषक असल्याने या सातही गावात खरीप हंगामात सुमारे साडेदहा हजार एकरावर बटाटाचे पीक घेतले जाते.बटाटा हे थंड हवामानातील पीक असून असेच हवामान त्याचे वाढीस पोषक असते. महाराष्ट्र राज्यात रब्बी हंगामात याचे अधिक उत्पादन येते. साधारणत: याची लागवड २५ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर या दरम्यान करतात. पुढील थंडीचा काळ याचे वाढीस पोषक असतो
बटाट्या हिंदीत आलू,इंग्रजीत पोटँटो,संस्कृत मध्ये आलुकःशास्त्रीय भाषेत सोलँनम ट्युबरोसम म्हणतात हे सोलँनसी कुळातील आहेत
अमेरिकेतून तो युरोप नंतर सतराव्या शतकात भारतात आला.
गुण.
बटाट्यांमध्ये फ्लॅवोनॉइड अॅन्टिऑक्सिडन्टसं असतात.बटाट्यांमध्ये व्हि़टॅमिन सी, व्हिटॅमिन बी6, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, झिंक आणि फॉस्फरसही आढळतं.बटाट्यामध्ये अ, ब, क जीवनसत्त्वाबरोबरच,कॅल्शियम, प्रथिनं यांसारखे गुण ठासून भरलेले आहेत. त्यामुळे बटाटा औषध म्हणूनही उत्तम काम करतो.
*यात असलेली मात्रा व त्याचे शरीराला फायदे.
बटाट्यामध्ये 8 टक्के फायबर, (संशोधनानुसार हा फायबर कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी महत्त्वाचा असतो.), 8 टक्के लोह (रक्त वाढण्यात उपयोगी), व्हिटॅमिन सी (व्हिटॅमिन सी जखम लवकर बरी होण्यासाठी उपयुक्त असतो. हिरड्या देखील मजबूत ठेवतो.), व्हिटॅमिन बी कॉम्पलेक्स (मेंदूचे कार्य योग्य पद्धती, जलद होण्यासाठी), पोटॅशियम (उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यात मदत करतो), आर्यन, कॅल्शियम, मॅगनीज,फॉस्फोरसचे प्रमाण अधिक असते.
**औषधी उपयोग. **
*बटाट्यामध्ये लिंबूदेखील मिक्स करून चेहर्यावर रोज लावल्याने चेह-याचा रंग उजळण्यास मदत होते, सुरकुत्या कमी होतात, अँन्टी एजिंग तत्व यात असल्याने तुम्ही तरुण दिसता. बटाट्याचा रसात लिंबू मिसळून ही लावता येतं.
*बटाट्याचा रस, बेसनपीठ, हळद, मध एकत्र करून लावल्यास चेहऱ्यावर चे डाग, सनबर्न, अंडर आय सर्कल अथवा डोळ्याखाली आलेली वर्तुळ कमी होतात.किसून दाबून रस काढू शकता.
*इंस्टंट गोरेपणा हवा असेल तर उकडलेला मँश केलेला बटाटा थोडा हलकेच गरम असताना चेहऱ्यावर पेस्ट करा. इनस्टंट ग्लो येऊन पार्टी समारंभाला जाऊ शकाल.
* चेहरा कोरडा पडला असेलतर साय, बटाट्याचा रस थोडे मध, किंचित हळद एकत्रित लावा त्वचा तजेलदार दिसेल.
*काकडी रस, टाँमँटो रस, दूध, बेकीग सोडा एकत्रित लावल्यास नँचरल क्लीनजनर तयार होईल ते तुम्ही मान खांदे पाठी कडील भाग चेहरा यावर लावलात व कापसानं काढलात की फरक तुम्हालाच कळून येईल.
* बटाटा रस काढून तो खोबरेल तेलात मिक्स करून केसांना दोन तास आधी लावा केस मुलायम साँफ, व डेन्ड्राँफ रहीत होतील.
* काही दिवस हा रस केसांच्या मुळांना स्काल्पवर लावल्यास केस गळती कमी होईल.
*फटका लागल्याने, चेमटल्याने, पडल्याने काळी निळी पडलेली त्वचा असेलतर रोज किंचित खोबरेल तेलात बटाट्याचा रस लावून त्या जागेच माँलीश करा. रक्तसंचार तेथील व्यवस्थित होऊन त्वचा काही दिवसात नाँर्मल होइल.
*कुठेही भाजले असेलतर बटाटा तात्काळ किसून लावा.
* रोज चुलीत भाजलेले बटाटे खा दोन तरी मध्यम साईजचे काळीमीरी, ओवा धनेजीरे पुड टाकून पोटसाफ होईल, संधीवात आमवात कमी होईल नंतर भरपूर पाणी प्यायल्यास पोटसाफ होईल.
* पित्ताच्या त्रासात चिमूटभर लवंग पुड व चमचाभर बटाटा रस, दोन चमचे कोबी रस व चमचाभर मध घालून पिऊन पहा. सकाळी सकाळी उठल्यावर घशाशी आंबट येणे, तोंड कडू पडणे, भुक नसणे, पचन न होणे आदी समस्या कमी झालेल्या दिसतील.
* खाज येत असलेल्या भागावर बटाट्याची चकती चोळा खाज कमी होईल
*बटाट्यांमध्ये व्हि़टॅमिन सी, व्हिटॅमिन बी6, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, झिंक आणि फॉस्फरसही आढळतं. तुमची त्वचा तजेलदार राहण्यासाठी हे घटक महत्त्वाचे ठरतात.
*बटाट्यांमधलं व्हिटॅमिन सी तुमची रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतं चमचाभर रस नियमितपणे पिऊ शकता.
*बटाट्यांमध्ये फ्लॅवोनॉइड अॅन्टिऑक्सिडन्टसं असतात ज्या मुळे कँन्सरची गाठ शरीरात वाटत असल्यास दोन चमचे बटाटा रस, तुळशीचा रस,व पाव भांडे गहू रोप रस नियमितपणे घ्या.
*बटाट्याचा रस अथवा भाजलेला बटाटा खालल्यास रक्तदाब सुरळीत राहतो.
*तोंड येत असल्यास भाजलेला बटाटा दोन ते तीन वेळा खा.
*दोन तीन मिली बटाट्याच्या पानांचा अथवा बटाट्याचा रस, मध चमचाभर व सैधव घालून प्यायल्यास सायनस व गळ्यात झालेली खवखव कमी होते.
*बटाट्याच्या पानांचा रस न मिळाल्यास बटाट्याचा रस, मध व कोरफडीचा गर एकत्रित करून घेतल्यास कफ कमी होतो.
*लघवी कमी होत असल्यास बटाटा भाजून खात जा व वरती पाणी प्या युरीन व्यवस्थित होईल.
*भाजलेले दोन तीन बटाटे खालल्यास आईच्या स्तनात भरपूर दूध येतं स्तन दूधानं भरतात.
*बटाटे भाजून मग ते कुस्करून शिरा करून खालल्यास अथवा हलवा बनवू न खालल्यास शरीरात आलेली कमजोरी दूर होते
* बटाटा भाजून आले, पुदीना पेस्ट घालून खा भूक व्यवस्थित लागेल व कमजोरी थकवा जाईल.
* कच्च्या बटाट्याची पेस्ट करून लावल्यास व्हाईट हेडची समस्या कमी होईल.
* एक चमचा ओटमील पावडर, एक चमचा बदामाची पावडर आणि दोन ते तीन चमचे बटाट्याचा रस घ्यावा. हे सर्व नीट एकत्र करावं. पाच मिनिटांनी बटाट्याच्या रसानं चेहरा धुवावा. आणि नंतर चेहरा परत गार पाण्यानं धुवावा.
*कच्चा बटाटा किसून त्याचा रस काढून तो सूज आलेल्या भागावर लावल्यास डोळ्यांवरची सूज कमी होते. बटाट्याचे काप सकाळी उठल्या उठल्या पाच मिनिटं डोळ्यावर ठेवल्यासही सूज कमी होते.
*बटाट्याचा रस दोन चमचे, दोन चमचे मध, दोन चमचे कोरफड गर एकत्रित करून लावा. केसांच्या मुळांना स्काल्पवर केस गळणे तुटणे, टक्कल पडणे कमी दिसेल.
*बटाट्याची साले गरमपाण्यात उकळून ते शँपू नंतर लावल्यास केस पांढरे होणे ही समस्या कमी होते.
* बेरीबेरी आजारात,झोकांड्या जात असल्यास, सायटीकाचा त्रास यात एक चमचा कच्च्या बटाट्याचा रस घ्या. रोज चारवेळा.
*रक्तपित्त, डोक्यात फोड येऊन लालरक्त पुरळ येणे, जखमात पू होणे यावर रोज तीन वेळा बटाट्याचा रस चमचाभर प्या.
*डोळ्यात जाळी येणे फुलपडणे, दृष्टी दोषात अथवा नजरेचा दोषात नदीतला एक दगड आणून त्यावर रोज बटाटा घासून येणारे काजळ सतत तीने महीने लावल्यास अमुलाग्र बदल होतो.
* बटाट्याचा रसात मध मिसळून मुलांना पाजल्यास हाडकी मुले ही छान गबदुली होतात.
*पाठदुखी, कंबरदुखी, मान दुखी, गुडघे दुखी अथवा कुठल्याही भागाच्या दुःखावर बटाटा किसून थोडा हलका गरम करून लेप द्या अथवा ते पोटीस बांधून ठेवा हे सगळे आजार दुर होतील.
* पोटात गँस होत असल्यास एक चमचा कच्च्या बटाट्याचा रस प्या.
* अंगावर गांध, चट्टे,फफोले येत असलेल्या भागावर बटाट्याचा रस तीन चार वेळा लावत जा.
* अँलर्जी मुळे अंगावर डाग पडत असतील तर अथवा चट्टे आल्यास बटाट्याचा रस लावा अथवा बटाटा घासून लावा
*चुकून काच पोटात गेल्यास उकडलेला बटाटा खायला द्या टाँयलेट मधून काच पडेल.
* बटाट्याचा पानांचा काढा पाजल्यास कावीळ आटोक्यात येते.
*फंगस, नायटे चट्टे यावर रोज दोन तीन वेळा बटाट्याचा रस लावा. सकाळी दुपारी संध्याकाळी बटाट्याचा चमचाभर रस प्या.
* साधारण साठी नंतर हातावर सुरकुत्या पडायला लागतात अशा माणसांनी रोज दोन वेळा तीळाच्या तेलात बटाट्याचा रस लावल्यास सुरकुत्या न पडता त्वचा टाईट राहील.
* चेहरा काळवंडत असल्यास रात्री बटाट्याचा रस लावून झोपा त्वचेला गोरेपणा येऊन स्कीन टाईट होईल
* डोकेदुखी वर आळूचे बी खाणे बेस्ट न मिळाल्यास चमचाभर रस प्या.
*शरीरावर कुठे ही सूज येत असेलतर पाव किलो बटाटे दोन लिटर पाण्यात उकळून त्या पाण्याने शेक द्या. कुठल्याही प्रकारची सूज ओसरेल
* पिंपल्स चे डाग चेहऱ्यावर असतील तर ग्लीसरीन, अँपल व्हेनिगर, गुलाब जल पाच पाच थेंब बटाट्याच्या रसात टाकून रोज रात्री लावून ठेवा
*हात फाटणे या समस्येवर एक उकडलेला छोटा बटाटा व आँलिव्ह आँईल एकत्रितपणे रोज लावत जा हात पुर्ववत होईल
* गोवर, विसर्प, कांजिण्या या आजारात होणाऱ्या पुळ्यावर कच्च्या बटाट्याचा रस लावा
*कच्च्या बटाट्याचा रस स्कार्वी, कमजोरी, अँनिमिया, फाटलेले ओठ व्हायरल संक्रमण, हिरड्याची समस्या, मेंदू रिलेटेड समस्या याचा नियमित सेवनामुळे कमी होतात.
* चमचा भर बटाट्याचा रस दिवसात तीन वेळा घेतल्यास जुलाब थांबतात. सोबत साखर मीठ पाण्याची क्षारसंजीवनी घ्यावी अथवा ओ आर एस अथवा इलेक्ट्राँल घ्यावे.पाणी भरपूर प्यावे.
*बटाटा शक्यतो सकाळी खावा. मात्र औषध म्हणून रस पिता ना एक ते दोन वेळा कमीत कमी घ्यावा.
*बटाट्यात ट्रिप्टोफेन नामक अँमीनो अँसिड असते ज्या मुळे सेराटोनीन हार्मोन्स चा स्तर वाढून मेंदू रिलँक्स रहातो ,झोप चांगली येते सकाळी व दुपारी रस प्यावा.
*आतड्याची सूज व ड्योडेनल अल्सर मध्ये लाभप्रद आहे.
*जेवणापूर्वी एक तास आगोदर कच्च्या बटाट्याचा रस घेतल्यास शरीरातील विषक्त तत्व जाऊन बाँडी डिटाँक्सीफिकेशन होते.
कोणी घेऊ नये.
गर्भवती महीलांनी कच्च्या बटाट्याचा रस पिऊ नये.
डायबेटीस, अतिरिक्त वजन वाढीची समस्या,पचन संबंधित गंभीर आजार असल्यास कच्च्या बटाट्याचा रस घेऊ नये.
हिरवट रंगाचे बटाटे खाऊ नका यात सोलनिन, चैकोनिन आणि आर्सेनिक सारखी अल्कलॉइड असतात जी शरीरावर घातक प्रभाव टाकतात.
जास्त खाल्यास काय होते.
*जास्त प्रमाणात खालल्यास वजन, पोट वाढून चरबी वाढू शकते.
*यातील पोट्याशियमच्या मात्रे मुळे जास्त खालल्यास मळमळ उलटी, छातीत जळजळ होऊ शकते.
*टाईप टू डायबेटीस ची समस्या अधिक खालल्यास होऊ शकते.
रस किती घ्यावा.
एक चमचा रस तीन ते चार वेळ.
वरील उपाया वरून आपल्याला बटाट्याचा औषधी वापर कळून आला असेल अशी आशा आहे.पोस्टचा उद्देश केवळ माहिती म्हणून आहे. पोस्ट लिहतांना अनेक पुस्तके व संदर्भ यांचा अभ्यास केला जात असल्याने उपाय खात्रीशीरच असतात.
कुठल्याही आजारावरील निशुल्क उपाययोजना साठी व्हाँटसप करा.
Comments
Post a Comment