WALNUT
*अक्रोड...*
विविध प्रकारच्या ड्राय फ्रुटमधले हे एक दर्जेदार, पौष्टिक फळ आहे, अक्रोडात अनेक आरोग्यदायी गुणधर्म आढळत असून शरिराची रोगप्रतिकारशक्ती
वाढवण्यासाठी हे अतिशय फायदेशिर आहे.
अक्रोडला "ब्रेन फूड" असे म्हणतात. अक्रोडात खुप प्रकारचे विटामिन असतात, जसे कि, विटामिन A, B, C, VitB12, विटामिन D, म्हणूनच याला विटामिनचा राजा म्हणतात.
अक्रोड आपल्या मेंदूसाठी खुपच फायदेशिर आहे. हे जवळपास मानवी मेंदू सारखेच दिसते, याच्या सेवनाने मानसिक ताण दूर होतो, मन प्रसन्न होते, बौद्धिक पातळी वाढते( I. Q.). स्मरणशक्ति वाढते, अक्रोडात शक्तिशाली न्यूरो प्रोटेक्टिव कंपाउंड सारखे विटमिन E. Omega-3 fatty acid व एंटि आँक्सिडंट असतात. ज्यामूळे मेंदूला सुरक्षा मिळते.
अक्रोड हे हृदयासाठीही लाभदायक आहे. याच्या सेवनाने शरिरातील चरबी कमी होते, कोलेस्ट्रोल नियंत्रणात राहते. कारण ओमेगा-3 फँटि एसिड जे हार्टकरता उपयोगी आहे, ते विपुल आहे, अक्रोडात Polyphenols या कँसरविरोधि घटकाचे प्रमाण जास्त असते त्यामूळे दररोज अक्रोड खाल्ल्यामुळे ब्रेस्ट कँसर, प्रोस्टेट कँसर, व मलाशयाचा कँसर होण्याचा धोका कमी होतो,
अक्रोड खाण्यामुळे भूक कमी लागते, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी उपयोग होतो, व याच कारणामूळे डायबेटिस२ आटोक्यात राहतो, अक्रोडामूळे रक्तातील साखर नियंत्रित राहते. उच्च रक्तदाब आटोक्यात राहतो. अक्रोड हा दुर्बल, अशक्त व्यक्तिंकरता खूपच लाभदायी आहे, सकाळी उठून २-३ अक्रोडाचे सेवन करावे, वरून एक कप दूध घ्यावे.
ज्या पुरूषांमध्ये शुक्रजंतू कमी असतात, ज्यामूळे ते प्रजोत्पादन करू शकत नाही, अशांनी नियमित अक्रोडाचे सेवन केल्यास फायदा होतो, अक्रोड हे वातघ्न असल्याने संधिवात, सायटिकि, सांधेदुखी, आमवात, या आजारावर चांगले परिणाम देते. ज्यांना गुडघे दुखीचा तीव्र स्वरूपात त्रास आहे त्यांनी सकाळी उठुन ३-४ अक्रोडाचे सेवन करावे.
अक्रोडाचे तेल नियमित सेवन केल्यास, आतड्यातील कृमी नाश पावतात व शौचावाटे बाहेर पडतात. अक्रोड हे सारक गुणधर्माचे असल्याने बद्धकोष्ठ, मलावरोध असणाऱ्यांनी अक्रोडाचे नियमित सेवन करावे, यात फायबर विपुल असल्याने वरिल त्रास होत नाही.
अक्रोड वनस्पतीची साल व पाने गंडमाळा, पुरळ, उपदंश, व त्वचारोग आदि रोगावर उपयोगी आहे.
अक्रोडाचि पाने कृमीनाशक आहे.
चेहऱ्यावरील काळे वांग, पिगमेटेशन, पुरळ असणाऱ्यांनी, अक्रोड बारिक वाटुन त्याचा लेप लावावा, चेहरा सुंदर होतो, अक्रोड बीज तेल हे साबण, व सौंदर्यवर्धक गोष्टित वापरतात, सहसा जेवणानंतर अक्रोड खावा, यामूळे जेवणाचे पचन चांगले होते. अकाली केस पांढरे होणे, केस गळणे या तक्रारिंवर, अक्रोड सिद्ध तेल वापरल्यास केस काळेभोर, व दाट होतात, .
तेव्हा अशा या भरपूर गुणांनी युक्त सुक्या मेवाला आपल्या दैनंदिन
Comments
Post a Comment