FOR DEEP SLEEP रात्री शांत झोप येण्यासाठी * झोप ही आपल्या दैनंदिन व्यवहारातली अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे . आपलं आरोग्य उत्तम राहावं यासाठी आहार , व्यायाम , मानसिक स्वास्थ्य हे जसं गरजेचं असतं , तसंच रात्रीची ७ ते ८ तासांची गाढ झोप होणंही तितकंच गरजेचं असतं . रात्री नीट शांत आणि सलग झोप झालेली असेल , तरच आपला पुढचा दिवस चांगला जातो . नाहीतर दिवसभर आपल्याला आळस आणि थकवा येत राहतो . झोप न झाल्याने अॅसिडीटी , डोकेदुखी अशा काही ना काही समस्या उद्भवत राहतात . पडल्या पडल्या झोप लागणारे खऱ्या अर्थाने सुखी असतात असं म्हटलं जातं , पण सगळ्यांनाच ते सुख लाभतं असं नाही काही जणांना पाठ टेकल्यावर झोप येण्याची देणगी असते , तर काहींना मात्र कितीही प्रयत्न केले तरी अजिबात झोप येत नाही . असं होण्यामागे बरीच कारणं असतात . यामध्ये आरोग्याच्या तक्रारी , मानसिक ताण , स्क्रीनचा अतिवापर , कामाचा ताण , कौटुंबिक जबाबदाऱ्या अशा बऱ्याच गोष्टींचा समावेश असतो . पण झोप पूर्ण झाली तरच मानसिक ...
Posts
Showing posts from October, 2025
- Get link
- X
- Other Apps
DRINKING WATER AFTER WAKING UP * 🫀 या ९ कारणांमुळे झोपेतून उठल्यावर सगळ्यात आधी प्यावं पाणी , 🧠 रोज भरपूर पाणी पिणं आपल्या शरीरासाठी फार महत्वाचं असतं . कारण याने पचन तंत्र , ब्लड सर्कुलेशन , टेम्प्रेचर रेगुलेशन आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघतात . रोज सकाळी झोपेतून उठल्यावर पाणी पिणं ही एक सगळ्यात चांगली सवय आहे . जी सगळ्यांना असली पाहिजे . अनेक तासांच्या झोपेनंतर पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट ठेवणे , तुमचं मेटाबॉलिज्म वाढणे आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत मिळते . दिवसाची सुरूवात पाणी पिऊन केल्याने दिवसभर एनर्जी सुद्धा मिळते . अशात आज रोज सकाळी झोपेतून उठल्यावर पाणी पिण्याचे काय फायदे होतात हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत . * १ ) शरीर पुन्हा हायड्रेट होतं : * अनेक तासांच्या झोपेनंतर तुमचं शरीर डिहायड्रेट होतं . अशात सकाळी झोपेतून उठल्यावर आधी पाणी प्यायल्याने शरीरातील कमी झालेलं पाणी भरून निघतं आणि हायड्रेशन लेव्हलही चांगली होते . ज्यामुळे शरीराच्या वेगवेगळ्या क...