AYURVEDIC TIPS
आयुर्वेद आणि
योगशास्त्रानुसार शरीरात
७२,०००
नाड्या (नसा/ऊर्जा
मार्ग) असतात.
त्या प्रत्यक्ष
नसांपेक्षा प्राणशक्तीच्या
वहनासाठीचे मार्ग
आहेत. ह्या
सर्व नाड्या
शुद्ध आणि
सक्रिय राहिल्या
तर शरीर-मन-आत्मा
संतुलित राहतो.*
*घरगुती
व नैसर्गिक
उपाय / प्रयोग
जे नाड्या
कार्यरत ठेवतात:
*
*🌿 १.
प्राणायाम (श्वसन
क्रिया)*
अनुलोम-विलोम
(नाडीशोधन) – हळूहळू
श्वास आत
घेणे व
सोडणे.
यामुळे नाड्या
शुद्ध होतात, ऑक्सिजनचा
पुरवठा वाढतो.
दररोज १५–२०
मिनिटे केल्याने
नसा कार्यरत
राहतात.
*🌿 २.
सूर्यनमस्कार*
सर्व स्नायू, सांधे
व नाड्यांना
कार्यशील ठेवतो.
सकाळी १२
सूर्यनमस्कार केल्यास
संपूर्ण नाडीसंस्था
जागृत राहते.
*🌿 ३.
तूपयुक्त दूध*
रात्री झोपण्यापूर्वी
कोमट दुधात
१ चमचा
तूप घेणे.
नसा, मज्जासंस्था
आणि मेंदूसाठी
पौष्टिक.
*🌿 ४.
तिळाचे तेल
मसाज (अभ्यंग)*
डोक्याला व
शरीराला गरम
तिळाच्या तेलाचा
मसाज.
रक्ताभिसरण सुधारते, नाड्यांमध्ये
अडथळे कमी
होतात.
*🌿 ५.
झोप व
दिनचर्या*
रात्रीची गाढ
झोप (७–८
तास) नाड्यांच्या
पुनर्बलनासाठी आवश्यक.
नियमित झोप-जागरणाचा
वेळ ठेवावा.
*🌿 ६.
आहारातील सुधारणा*
ताजे फळे, भाज्या, अंकुरित
धान्य, कोरडे
मेवे यांचा
समावेश.
अतिखारट, अतितिखट, जास्त
तळलेले टाळावे.
भरपूर कोमट
पाणी प्यावे.
*🌿 ७.
ध्यान आणि
मंत्रजप*
"ॐ"
उच्चार किंवा
साधे ध्यान
– प्राणशक्तीचा प्रवाह
सुरळीत करते.
*नाड्या
संतुलित ठेवते.
*🌿 ७२
हजार नसा
कार्यरत करण्यासाठी
तळपाय शेक
प्रयोग*
*✨ लागणारे
साहित्य: *
१ टब
कोमट पाणी
(गुडग्यापर्यंत बुडतील
एवढे)
४ कापूर
वड्या (कापूर
– नसांना जागृत
करणारा)
½ लिंबू
रसासकट (शुद्धी
व ताजेतवानेपणा)
२ चमचे
मीठ (सेंधा
मीठ / साधे
मीठ – शरीरातील
थकवा व
सूज कमी
करणारे)
१ चमचा
हळद (जंतुनाशक, सूज
व वेदना
कमी करणारी)
✨ *प्रयोग
करण्याची पद्धत:
*
१. एका
टबमध्ये कोमट
पाणी घ्या
(सहन होईल
इतके गरम, फार
जास्त नको).
2. त्यात
कापूर वड्या, लिंबाचा
रस, मीठ
व हळद
टाका.
3. पाय
टाचांपर्यंत पाण्यात
बुडवा.
4. १५–२०
मिनिटे शांत
बसून पाय
पाण्यात ठेवा.
5. नंतर
पाय काढून
कोरड्या टॉवेलने
पुसा.
6. शेवटी
तिळाचे तेल
किंवा नारळाचे
तेल हलक्या
हाताने पायांना
मसाज करा.
*✨ फायदे:
*
तळपायातील मर्मबिंदू
सक्रिय होतात
→ त्यांचा थेट
परिणाम ७२,०००
नाड्यांवर होतो.
रक्ताभिसरण सुधारते, थकवा, वेदना
कमी होतात.
मज्जासंस्था मजबूत
होते व
ताण-तणाव
कमी होतो.
झोप चांगली
लागते, मेंदू
शांत राहतो.
शरीरातील प्राणशक्ती
(ऊर्जा) संतुलित
राहते.
Comments
Post a Comment