FOOD FOR STRONGER BONES

*पोलादासारखी मजबूत होतील हाडं- ५ पदार्थ खा, गुडघ्यांची कुरकुर, पाठदुखी कायमची थांबेल*

हल्ली कमी वयातच हाडांच्या कित्येक समस्या डोकं वर काढत आहेत. गुडघेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी असे वेगवेगळे त्रास कमी वयातच सुरू झाले आहेत.

म्हणूनच आपल्या आहारात असे काही पदार्थ असायला हवेत जे भरपूर प्रमाणात कॅल्शियम देतील, जेणेकरून हाडांना बळकटी मिळेल. ते पदार्थ नेमके कोणते ते पाहूया..

*त्यापैकी पहिला पदार्थ आहे तीळ. तिळामध्ये* *कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते* त्यामुळे हाडं आणि दातांच्या मजबुतीसाठी तीळ फायदेशीर ठरतात. भाकरीला लावून, चटणीच्या स्वरुपात किंवा लाडू करून तुम्ही तीळ खाऊ शकता.

*दुसरा पदार्थ आहे राजगिरा.* त्यातून भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि लोह मिळते. पण आपण राजगिरा फक्त उपवासाच्या दिवशीच खाताे. तसं नस करता तो नियमितपणे खायला हवा. कारण हाडांच्या बळकटीसाठी तो खूप गरजेचा आहे. शिवाय पचायलाही हलका असतो.

*खसखस हाडांच्या मजबुतीसाठी तर फायदेशीर ठरतेच*, पण चांगली झोप येण्यासाठी, मज्जासंस्था आणि स्नायूंच्या आराेग्यासाठीही तिचा उपयोग होतो.

*वाढत्या वयाच्या मुलांसाठी आणि महिलांसाठी नाचणी* हा कॅल्शियमचा एक उत्तम स्त्रोत मानला जातो. नाचणीचे लाडू, इडली, डोसा, पराठे या स्वरुपात नाचणी खायला हवी.

*भरपूर कॅल्शयम देणारा आणखी एक पदार्थ म्हणजे शेवगा.* त्यामुळे मोठ्या माणसांनी तर शेवगा खायलाच हवा पण लहान मुलांनाही तो आवर्जून द्यायला हवा.
*🌺🙏 निरोगी आयुष्याची सुरुवात आजच करा 🙏🌺*

Comments

Popular posts from this blog