*काही किरकोळ रोगावर हे सोपे घरगुती उपाय करून पहा.... *

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> 

*सर्दी होतेय...*

* चमचा मधामध्ये चिमूटभर दालचिनी पावडर मिसळून दिवसातून दोनदा चाटा.

 

*जर सर्दीमुळे डोके जड झाले असेल, तर सुंठाचा लेप कपाळावर लावल्याने आराम मिळतो.

 

*नाकातून पाणी येतेय...*

*जायफळ वेखंड थोडे उगाळून त्याचा लेप नाकावर कपाळावर लावा तेच मधात मिसळून चाटल्याने सर्दीमध्ये खूप लवकर आराम पडतो.

 

*कफ...*

*१०-१२ तुळशीची पाने, - काळी मिरी आणि आल्याचा तुकडा पाण्यात उकळा.

*​पाणी निम्मे झाल्यावर ते गाळून कोमट असताना प्या.

*​हा काढा कफ खोकल्यावर रामबाण उपाय मानला जातो.

 

*घशात खवखव...*

*आल्याचा रस आणि मध समप्रमाणात घेऊन ते चाटल्याने घशातील खवखव त्वरित थांबते.

*१०-१२ तुळशीची पाने पाण्यात उकळून तो काढा कोमट असताना प्यावा.

 

 *डोकेदुखी...*

*तुळशीची पाने पाण्यात उकळून त्यात थोडे मध टाकून प्यायल्याने डोके शांत होते.

*जर डोकेदुखी पित्त किंवा गॅसमुळे असेल, तर कोमट पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यायल्याने आराम मिळतो.

*जर ताणामुळे डोके दुखत असेल तर मानेच्या मागे गरम पिशवीने शेका. जर मायग्रेन असेल तर कपाळावर बर्फाचा पॅक ठेवा.

*आल्याचा रस आणि पुदीन्याचा रस चमचा चमचाभर एकत्र करून घ्या डोकेदुखी थांबेल.

 

 *रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी...*

अनेक रोग रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे होत असतात हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा. त्यासाठी घरात गुळवेल आणून ठेवा.

*गुळवेलाची एक दोन काडी ठेचून पाण्यात उकळून त्याचा काढा प्या. हे रक्तातील प्लेटलेट्स वाढवते आणि इम्युनिटीसाठी सर्वोत्तम औषध मानले जाते.

 

Comments

Popular posts from this blog