अधिकस्य अधिकं फलं !

मी गेले अनेक वर्ष साधारण १० वर्ष विष्णुसहस्रनामाचे पठण करत असल्यामुळे त्याचे अत्यंत पॉझिटिव्ह परिणाम मी अनुभवत आहे. विष्णुसहस्रनाम ह्याचा प्रत्येक श्लोक सिद्ध आहे आणि हे मंत्र उच्चरण  आपल्याला अनेक स्तरावर फायदा करून देते , काय करू खरतर फायदे तोटे हे शब्द इतक्या अलौकिक मंत्रांना लागू होत नाही पण आपण ज्या जगात राहतोय तिथे आपल्याला प्रत्येक गोष्ट हि फायदा आणि तोटा ह्यासाठी करतात अशी मनोधारणा झाली आहे हे नक्की आणि त्यात काही चुकीचं नसावही कदाचित . तर हे सहस्त्रनाम तुमच्या भौतिक, आर्थिक , मानसिक आणि शारीरिक म्हणजे अगदी प्रत्येक शरीरातल्या सेल वर काम करतं हे १०००% सत्य. आजच्या भाषेत सांगायचं तर माझ्यासाठी तरी हे बॅटरी रिचार्जिंग स्तोत्र आहे आणि प्रत्येकासाठी हि आहेच. अजून काय हवं मग सांगा ? तर ह्यावर्षीचा अधिकमास १७ मी पासून सुरु होतोय तो १५ जून पर्यंत आहे साधारण २९.५ दिवसाचा हा एक्सट्रा महिना आहे तो तुमच्या प्रत्येक गोष्टीत अधिक करण्यासाठी आलाय . तर काही खालील मस्त सोपे उपाय आहेत , तर मला वाटलं कि तुमच्यासंगळ्यांबरोबर शेअर करावेत. अगदी खरं सांगू का अगदी सगळे उपाय नाही जमले किंवा काहीच नाही जमले व्यस्त जीवना मुळे तर दररोज विष्णुसहस्रनाम म्हणा , त्यातही जर एकाजागी बसून नसेल वेळ तर गाडीवरून किंवा गाडीतून , चालताना, फिरताना म्हणू शकता किंवा ऐकू शकता , हे स्तोत्र कळायला अवघड आहे त्यामुळे अगदी टेक्निकली जरी म्हणलं तरी ह्याचे अगणित फायदेच फायदे आहेत , अक्षरशः लॉटरी १००० कोटी ची लागली असा मला आजही आनंद होतो . काय सांगू . तर खालील काही मस्त उपाय ह्या अधिक मास निमित्त. ह्याच नोट वर तुम्हा सर्वांचे सर्व अधिकोत्तम होवो हीच भगवंतांचरणी प्रार्थना 

🚩 अधिक मास (पुरुषोत्तम मास) : महत्त्व आणि सोपे घरगुती उपाय 🚩

सप्रेम नमस्कार मित्रांनो,

दर तीन वर्षांनी येणारा 'अधिक मास' आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी एक सुवर्णसंधी असतो. या महिन्याला 'पुरुषोत्तम मास' असेही म्हणतात, कारण या महिन्याचे स्वामी स्वतः भगवान विष्णू आहेत. या काळात केलेल्या उपासनेचे फळ इतर महिन्यांच्या तुलनेत अनेक पटींनी जास्त मिळते.

सर्व भाविकांना या पवित्र महिन्याचा लाभ व्हावा, म्हणून काही महत्त्वाच्या गोष्टी आणि सोपे उपाय खाली दिले आहेत:

✨ अधिक मासाचे महत्त्व:

हा महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे, त्यामुळे विष्णू भक्तीसाठी हा काळ सर्वोत्तम मानला जातो.

या महिन्यात दान-धर्म, जप आणि तप केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते.

नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि घरातील सुख-शांती वाढवण्यासाठी हा काळ अत्यंत प्रभावी आहे.

🌟 सोपे आणि प्रभावी उपाय (सर्वांना करता येतील असे):

१. दीपदान (सर्वात महत्त्वाचे): 33 दिवे 

अधिक मासात दीपदानाला खूप महत्त्व आहे. शक्य असल्यास दररोज संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजावर किंवा तुळशीपाशी गाईच्या तुपाचा दिवा लावावा. यामुळे घरातील दारिद्र्य दूर होते.

२. 'ओम नमो भगवते वासुदेवाय' जप:

कामाच्या गडबडीतही तुम्ही भगवान विष्णूंच्या या 'द्वादशाक्षरी' मंत्राचा १०८ वेळा जप करू शकता. यामुळे मन शांत राहते आणि कामात यश मिळते.

३. भगवद्गीतेचा १५ वा अध्याय (पुरुषोत्तम योग):

या महिन्यात दररोज गीतेच्या १५ व्या अध्यायाचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते. जर वाचन शक्य नसेल, तर तो फक्त ऐकला तरी चालतो.

४. अनारसे किंवा वाण देणे:

महाराष्ट्रीयन परंपरेनुसार, या महिन्यात जावयाला किंवा गरजू व्यक्तीला ३३ अनारसे वाण म्हणून देण्याची पद्धत आहे. अनारसे उपलब्ध नसल्यास फळे किंवा इतर धान्य दान करावे.

५. काय टाळावे?

या महिन्यात नवीन घर खरेदी, लग्न, मुंज किंवा मोठे शुभ कार्य करणे टाळावे. हा काळ बाह्य सुखापेक्षा आंतरिक शुद्धीसाठी जास्त महत्त्वाचा असतो.

हा संदेश जास्तीत जास्त मित्र आणि नातेवाईकांपर्यंत पोहोचवा (Share करा), जेणेकरून सर्वांना या पुरुषोत्तम मासाचे पुण्य लाभेल! 🙏

ॐ नमो नारायणाय 🙏🙏

🙏

Hello Nitin. You were to send information on some specific shlokas from Vishnu Sahasranam to be chanted based on our date of birth ,place of birth, time of birth, nakshatra and Charan. Kindly send that information.

❝ श्रीविष्णुसहस्त्रनाम स्तोत्र आणि बारा राशी. ❞

ज्या व्यक्तींना आपल्या राशी, नक्षत्र व चरणप्रमाणे विष्णु सहस्त्रनामचे महत्वाचे श्लोक पाहिजे आहेत, त्यांच्यासाठी प्रत्येक राशीसाठी माहिती खालीलप्रमाणे.

(मेष ते मीन राशीपर्यंत)

विशिष्ट नक्षत्र चरण दोष निवारण करण्यासाठी विष्णू सहस्त्रनामामधील विशिष्ट श्लोक म्हणावा, याला काही आधार आहे का ? असा प्रश्न पडणे सहाजिकच आहे.

दत्त भक्त योगीराज वामनरावजी दत्तात्रय गुळवणी महाराज हे महान दत्तभक्त व शक्तीपातयोगाचे परमाचार्य म्हणून जगद्विख्यात होऊन गेले. परमहंस परिव्राजक श्रीमद वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी महाराज) यांनी गुळवणी महाराजांना मंत्र दीक्षा दिली, त्याच बरोबर गीता, विष्णू सहस्त्रनाम याची संथा स्वतः महाराजांनी त्यांना दिली व बंधनमुक्त होण्यासाठी संप्रदायाची उपासना सांगितली ती अशी..

स्वशाखोपनिषत गीता विष्णुनामसह…

https://youtu.be/UwuM0xgA_H8?si=tZeL-2AlNwMuHnOJ

Comments

Popular posts from this blog