HEALTH MANTRA

*हेल्थ मंत्रा | आरोग्य मंत्र |*

* सोप्या गोष्टी करा आणि आनंदी निरोगी दीर्घायुष्य मिळवा-रामदेव बाबांचा सल्ला.... *

आपण निरोगी जगावं आणि दीर्घायुष्य मिळावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण आजकाल तरूण वयातच लोकांना गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे  वयाच्या साठीत किंवा पन्नाशीतच बऱ्याच लोकांचा मृत्यू होत आहे आणि जे लोक जास्त काळ जगतात त्यांना बऱ्याच आजारांचा सामना करावा लागतो.

*निरोगी दीर्घायुष्यासाठी रामदेव बाबा काय सांगतात...? *

रामदेव बाबा सांगतात की आपल्या घरात किंवा ऑफिसमध्ये नो एंगर झोनचे पोस्टर लावा. कारण जास्त रागावल्यानं तुमचं  आयुष्य कमी होतं. या पोस्टरमुळे फक्त तुम्हीच नाही तर तुमच्याशी गप्पा मारणारे लोकही शांत राहतील आणि संयम ठेवून तुमच्याशी बोलतील. 

फक्त तहान लागल्यावरच नाही तर तहान नसेल तेव्हाही पाणी प्या. रोज कमीत कमी लिटर पाणी प्या हा तुमच्या शरीराचा स्वस्त उपाय आहे. याशिवाय तुमच्या खाण्यापिण्याचीही काळजी घ्या. माईंडफुल इटींग ठेवा. इट टू लिव्ह, नॉट लिव्ह टू इट असं धोरण ठेवा.

रोजच्या आहारात कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण कमी ठेवून, जास्तीत जास्त प्रोटीन्स खा, कमीत  कमी आठवड्यांसाठी मिठाचं सेवन करू नका. शरीर नेहमी एक्टिव्ह ठेवा. पायी चाला किंवा सायकलचा वापर करा. लिफ्टऐवजी शिड्यांचा वापर करा. तुम्ही जितके चालाल तितकेच तुमचे आयुष्य वाढेल. याशिवाय पैश्यांच्या मागे धावू नका. तुमची वेळ आणि एनर्जी आपल्या नात्यांसाठी द्या.  थिंक पॉझिटिव्ह म्हणजे जे आहे, जसं आहे त्यात आनंदी राहायला शिकायला हवं.

इम्युनिटी मजबूत करण्यासाठी गुळवेल-तुळशीचा काढा, हळदीचं दूध, हंगामी फळं खा, बदाम-अक्रोड खा. हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी दूधीचं सूप प्या,दूधीची भाजी खाऊ शकता किंवा ज्यूस तयार करून प्या. किडनीचे आजार टाळण्यासाठी मीठ, साखर, प्रोटीनयुक्त पदार्थ यांचे अतिसेवन करू नका. रोज वर्कआऊट नक्की करा, सकाळी एप्पल सायडर व्हिनेगर घ्या. रात्री हळदीचं दूध प्यायला विसरू नका. काहीवेळ उन्हात बसा, तासांची झोप घ्या.

 

Comments

Popular posts from this blog