VEGETABLES FOR DIABATIS

 

मधुमेह असलेल्या रुग्णांनी कोणत्या भाज्या खाव्यात?* 🌿

साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त माहिती.. 👇

        मधुमेह असलेल्या रुग्णांनी आहारात *भाज्यांचा जास्त समावेश* करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण भाज्यांमध्ये साखरेचे प्रमाण कमी, तर *फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर* असतात.

 

🥦 *फुलकोबी (Flower Cabbage) *

        फायबर, जीवनसत्त्वे खनिजांनी समृद्ध असलेली फुलकोबी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

 

🥬 *कोबी (Cabbage)*

        कमी चरबीयुक्त कोबीमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, सोडियम यांसारखी खनिजे विविध जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात.

 

🥦 *ब्रोकोली (Broccoli)*

        100 ग्रॅम ब्रोकोलीमध्ये केवळ *2 ग्रॅम साखर* असते. भरपूर जीवनसत्त्वे खनिजे असल्यामुळे ब्रोकोली हे मधुमेह रुग्णांसाठी *वरदान* आहे.

 

🌱 *भेंडी (Okra)*

        भेंडीमध्ये कॅलरीज खूप कमी असतात आणि ती रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

👉 मधुमेहावर नियंत्रण हवे असेल तर भेंडीचा नियमित आहारात समावेश करा.

 

🥒 *काकडी (Cucumber)*

        100 ग्रॅम काकडीत सुमारे *95 ग्रॅम पाणी* फक्त *2 ग्रॅम साखर* असते. त्यामुळे काकडी शरीर थंड ठेवते साखर नियंत्रणात ठेवण्यास उपयुक्त ठरते.

 

🌿 *कारले (Bitter Gourd)*

        कारले ही मधुमेहासाठी सर्वोत्तम भाजी मानली जाते. ती नैसर्गिकरित्या रक्तातील साखर कमी करण्यास मदत करते.

 

🌿 *दुधी भोपळा*

        साखरेचे प्रमाण खूप कमी, पचनास हलका आणि साखर नियंत्रणासाठी उपयुक्त.

 

🌿 *घोसाळे*

        कमी कॅलरीज, कमी साखर आणि शरीर थंड ठेवणारी भाजी.

 

🌿 *मुळा*

        मुळा फायबरयुक्त असून रक्तातील साखर संतुलित ठेवण्यास मदत करतो.

 

🌿 *मेथीची भाजी*

        मेथीमध्ये नैसर्गिक घटक असतात जे इन्सुलिनची कार्यक्षमता वाढवतात.

 

🌿 *पालक*

        लोह, फायबर अँटीऑक्सिडंट्स भरपूर असून साखर वाढवत नाही.

 

🌿 *चवळीची भाजी*

        फायबर जास्त आणि साखर कमी असल्यामुळे शुगर रुग्णांसाठी योग्य.

 

🌿 *फणसाची कोवळी भाजी (Raw Jackfruit – मर्यादित प्रमाणात) *

        फायबर भरपूर असल्यामुळे साखर झपाट्याने वाढत नाही.

------------------------!!-----------------------

 

Comments

Popular posts from this blog