YOUR STOMACH

 

पोटाचे आत्मवृत्त*

*“नमस्कार….......*

*मी तुमचंच पोट बोलतोय. *

*पण खरं सांगायचं तर मी फक्त पोट नाही, *

*मी जठराग्नी आहे —*

*तुमच्या आरोग्याचा राजा*

*आयुर्वेद स्पष्ट सांगतो—*

*रोगा: सर्वेऽपि मन्दाग्नौ’*

*माझी शक्ती मंद झाली, *

*की रोगांना आमंत्रण* *मिळतं. *

सकाळी उठल्यावर

मी अजून कालचं अन्न पचवून

स्वच्छ होण्याच्या प्रक्रियेत असतो.

मला हवं असतं

थोडं कोमट पाणी, शांत वेळ,

आणि खरी भूक लागेपर्यंत प्रतीक्षा.

पण तुम्ही काय करता?

उठल्या-उठल्या चहा, बिस्कीट, खारी टोस्ट.

भूक नसतानाही मला भरता!

भूक म्हणजे माझी परवानगी,

आणि भूक नसताना खाणं

म्हणजे माझ्यावर जबरदस्ती.

चहा माझा अग्नी जागा करत नाही,

तो मला फक्त फसवतो.

बिस्कीट-टोस्ट

ना अन्न, ना औषध

फक्त आम तयार करणारी सामग्री.

*मग म्हणता—*

सकाळीच पोट जड वाटतं!”

दुपारी बारा-एक वाजता

मी सर्वात शक्तिशाली असतो

हा माझा सुवर्णकाळ आहे.

भाजी-भाकरी, डाळ-भात

यासाठीच हा वेळ असतो.

*पण जेवताना तुमचं लक्ष कुठे? *

टीव्ही, मोबाईल, बातम्या, रील्स!

आयुर्वेद म्हणतो

चित्तं अन्ने निवेशयेत्

पण तुमचं चित्त

स्क्रीनवर अडकलेलं असतं.

अन्न पाहता खाल्लं जातं,

चावता गिळलं जातं,

आणि मला मिळतं

अर्धवट, विस्कळीत अन्न.

*परिणाम? *

वात वाढतोगॅस

पित्त भडकतंआम्लपित्त

कफ साठतोजडपणा, आळस

*पावसाळ्यात तर माझी परीक्षा असतेच—*

मंद अग्नी, अशुद्ध पाणी,

उघड्यावरचं अन्न

आम साठतो आणि

जुलाब-उलटी-अपचन सुरू होतं.

रात्री मी विश्रांती मागतो.

दहानंतर माझी ताकद कमी होते.

पण तुम्ही म्हणता

चला पाणीपुरी, आइसक्रीम खाऊ!”

पिझ्झा ऑर्डर करूया!”

मी पचवण्याचा प्रयत्न करतो,

पण जमल्यावर

मी संकेत देतो

गॅस, जळजळ, दुखणं.

तो रोग नाही,

तो माझा आक्रोश आहे!

मग औषधं, सोडा, कोरा चहा

पण मूळ सवय बदलली नाही

तर आम पुन्हा तयार होतोच.

*माझ्या मागण्या फार नाहीत—*

*फक्त आयुर्वेदाने सांगितलेल्या: *

) वेळेवर अन्न (कालभोजन)

) ताजं, साधं जेवण (हितभोजन)

) मित प्रमाणात खाणं

) रात्री लवकर हलकं जेवण

) भूक असेल तेव्हाच खाणं

) जेवताना मोबाईल-टीव्ही बंद

*हे पाळलंत ना, *

*तर मला औषधांची गरजच पडणार नाही*

*लक्षात ठेवा—*

मी तुमचा नोकर नाही,

मी तुमचा सहप्रवासी आहे.

मी स्वस्थ, तर तुम्ही निरोगी!”

 

Comments

Popular posts from this blog